Mumbai Tak /बातम्या / Team India साठी आनंदाची बातमी, T20 वर्ल्ड कपमध्ये मिळाला थेट प्रवेश
बातम्या स्पोर्ट्स

Team India साठी आनंदाची बातमी, T20 वर्ल्ड कपमध्ये मिळाला थेट प्रवेश

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून (Australia) उपांत्य सामन्यात पराभवाला स्विकारावा लागल्यामुळे टीम इंडियाला (Team India) विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करता आलेलं नाही. अशात काहीशा निराश झालेल्या टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. 2024 साली बांगलादेशमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) टीम इंडियाला थेट प्रवेश मिळाला आहे. उपांत्य फेरी गाठल्याचा फायदा इथे टीम इंडियाला मिळाला आहे. (The dream of winning the World Cup could not be fulfilled as they had to accept the defeat by Australia in the semi-final match. There is good news for the somewhat disappointed Team India)

यंदाच्या विश्वचषकात दोन्ही गटातील प्रत्येकी टॉप-३ अशा ६ संघांना आगामी विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. भारतीय संघाने आपल्या गटात टॉप-३ मध्ये स्थान मिळवलं होतं. या सहा संघांशिवाय बांगलादेश आणि पाकिस्तानला यजमान राष्ट्र म्हणून पुढील विश्वचषकात थेट प्रवेश मिळाला आहे.

India vs Australia : डेव्हिड वॉर्नर मालिकेतून ‘आऊट’; ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का

आगामी विश्वचषकासाठी पहिल्या गटातून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेला प्रवेश मिळाला आहे. तर दुसऱ्या गटातून इंग्लंड, भारत, वेस्ट इंडिज या संघांना प्रवेश मिळाला आहे. या T20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांमध्ये श्रीलंका आणि आयर्लंड हे दोनच संघ पुढील विश्वचषकासाठी पात्र ठरले नाहीत. दरम्यान, आता ICC कडून T20 विश्वचषक 2024 साठी क्वालिफायर राऊंडचं आयोजन केलं जाणार आहे. यातून दोन संघ पात्र ठरविले जाणार आहेत.

Team India ठरली तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप; ‘या’ खेळाडूंनीही गाजवलं नावं

T20 विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाची कामगिरी :

  • पाकिस्तान विरुद्ध 7 गडी राखून विजयी

  • वेस्ट इंडिज विरुद्ध 6 विकेट्सने विजयी •

  • इंग्लंड विरुद्ध 11 धावांनी पराभूत •

  • आयर्लंड विरुद्ध 5 धावांनी विजयी •

  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 धावांनी पराभूत (उपांत्य फेरी)

ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 धावांनी पराभूत :

आयसीसी वूमन्स टी 20 विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर ५ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी १७३ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून केवळ 167 धावां करता आल्या. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या १७३ धावांचा पाठलाग करताना आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले होते.

एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार?