बॉलिवूड अभिनेत्रींपुढे ‘या’ क्रिकेटर्संनी टाकली विकेट!
बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं खूप जुनं नातं आहे. अनेक क्रिकेटर हे बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रेमात पडल्याचं आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. विराट कोहली ते जहीर खान अनेक खेळाडू हे बॉलिवूड अभिनेत्रींसमोर क्लीन बोल्ड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. अनुष्का आणि विराट कोहली यांच्या अफेअरबाबत सगळ्यात आधी 2014 साली चर्चा सुरु झाली होती. 2017 साली दोघांनी इटलीमध्ये […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं खूप जुनं नातं आहे. अनेक क्रिकेटर हे बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रेमात पडल्याचं आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालं आहे.
विराट कोहली ते जहीर खान अनेक खेळाडू हे बॉलिवूड अभिनेत्रींसमोर क्लीन बोल्ड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे.
अनुष्का आणि विराट कोहली यांच्या अफेअरबाबत सगळ्यात आधी 2014 साली चर्चा सुरु झाली होती.
2017 साली दोघांनी इटलीमध्ये जाऊन लग्न केलं होतं. हे जोडपं सगळ्यात प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडपं आहे.
जहीर खानने चक दे इंडिया फेम सागरिका घाटगेशी लग्ना केलं आहे.
सागरिका आणि जहीरने अगदी जवळच्या नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थिती कोर्ट मॅरेज केलं होतं.
सागरिका आणि जहीर हे रिलेशनमध्ये आहेत याबाबत कुणालाही कुणकुण नव्हती. मात्र, युवराजच्या लग्नात दोघं एकत्र दिसले होते. ज्यानंतर त्याविषयी चर्चा सुरु झाली.
युवराज सिंह आणि हेजल कीच यांनी 2016 साली लग्न केलं होतं.
हेजल आणि युवराज हे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर 2016 साली ते लग्नबंधनात अडकले.
हरभजन सिंहने अभिनेत्री गीता बसरा हिच्यासोबत लग्न केलं आहे.
हार्दिक पंड्या आणि नताशा यांनी जानेवारी 2020 मध्ये अचानक लग्न केलं होतं. ज्यानंतर त्यांनी त्याच वर्षी लग्नही केलं.