IPL 2025 एका आठवड्यानंतर होणार सुरू? स्पर्धा कुठे आणि कशी होणार... बीसीसीआयनं सांगितलं
IPL 2025 : भारत पाकिस्तान या दोन्ही देशात युद्ध सुरू आहे. याचपार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीग स्थगित करण्यात आलीय. अशातच आता बीसीसीआयनं आयपील पुन्हा कुठे आणि कशी खेळता येईल यावर मोठी घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारत पाकिस्तान या दोन्ही देशात युद्ध सुरू आहे.

याचपार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीग स्थगित करण्यात आलीय.

आयपीएल नेमकं कुठे होणार?
IPL 2025 : भारत पाकिस्तान या दोन्ही देशात युद्ध सुरू आहे. याचपार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीग स्थगित करण्यात आलीय. अशातच आता आयपीएल नेमकं कुठे होणार? असा प्रश्न निर्माण होताना दिसतोय. बीसीसीआय याबाबत नियोजन करणार आहे. हे सामने कुठे आणि केव्हा होणार? असा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.
बीसीसीआयनं आयपीएलला 9 मे रोजी एका आठवड्यासाठी स्थगित केलं. बीसीसीआयनं परिस्थिती लक्षात घेत तात्काळपणे हा निर्णय घेतला आहे. आयपीएलचं सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केलं जाणार आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये 8 मे रोजी 58 वा सामना खेळवण्यात आला होता. अशात किंग्स पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्सचा यात समावेश आहे. अशातच बुधवारी 8 मे रोजी धर्मशाळा येथे सामना सुरू होता. युद्धजन्य परिस्थिती पाहता हा सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित करण्यात आली.
आयपीएलचे उर्वरित 12 सामने तसेच कोलकात्यात होणारे एकूण 4 सामने खेळवले जाणार होते. 25 मे ही आयपीएलची अंतिम तारीख होती. कोरोना काळात आयपीएलवर संकट आलं होतं. त्यावेळी आयपीएलचे सामने एका आठवड्यांपूरते थांबविण्यात आले आहेत. या युद्धजन्य परिस्थितीत आयपीएल पुन्हा कसं सुरू केलं जाईल याबाबत थोडक्यात माहिती समोर आली आहे.