मोठी बातमी : रुपाली चाकणकरांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवा, राष्ट्रवादीतील महिला नेत्या कडाडल्या, थेट सूनेत्रा पवारांना पत्र

मुंबई तक

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा थेट संपर्क असल्याचे उघड, ही बाब अत्यंत लज्जास्पद.. रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून आणि पक्षातील सर्व पदांवरून तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी नाशिक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षांनी केली आहे.

ADVERTISEMENT

Rupali Chakankar
Rupali Chakankar
google news

बातम्या हायलाइट

point

मोठी बातमी : रुपाली चाकणकरांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवा,

point

राष्ट्रवादीतील महिला नेत्या कडाडल्या, थेट सूनेत्रा पवारांना पत्र

Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा थेट संपर्क असल्याचे उघड झालंय.  ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून आणि पक्षातील सर्व पदांवरून तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी केली आहे. त्या नाशिक येथे बोलत होत्या. शिवाय, यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सूनेत्रा पवार यांना एक पत्र देखील लिहिलंय. शिवाय, नाशकातील प्रत्येक तालुक्याच्या तालुकाध्यक्षांनी प्रेरणा बलकवडे याच्याकडे चाकणकरांना हटवण्याची मागणी केल्याचंही सांगितलंय. 

हेही वाचा : लुडो खेळताना दीराने चिमटा काढला, वहिनी थेट रागीट असलेल्या पतीला फोन करणार...इतक्यात भयंकर घडलं

प्रेरणा बलकवडे यांचे पत्र जसेच्या तसे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांचा सन्मान आणि न्यायासाठी कटिबद्ध असलेला पक्ष आहे. याच मूल्यांवर विश्वास ठेवून आम्ही, नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या, पक्षाचे काम निष्ठेने करत आहोत. परंतु, आज पक्षाच्या अस्तित्वावर आणि तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, आणि त्याच तीव्र वेदनेतून आम्ही हे आवाहन करत आहोत.

डॉ. अशोक खरात यांच्याकडून अनेक महिला आणि तरुण मुलींचा छळ झाल्याच्या भयानक प्रकरणात पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष, सौ. रूपाली चाकणकर यांचा थेट संपर्क असल्याचे उघड झाले आहे. ही अत्यंत लज्जास्पद वाव आहे की, अनेक वर्षांपासून महिलांचा छळ करणाऱ्या व्यक्तीचे त्या समर्थन करत आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात पक्षाच्या प्रतिमेचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

हे वाचलं का?