रेडा चोरीच्या संशयावरुन मजूराची हत्या, हत्येआधी शेतात हवन अन् नंतर गंगा नदीत अंघोळ करुन 'पाप' धुतले
Crime News : माणुसकीला काळिमा फासणाऱ्या एका खळबळजनक हत्याकांडाचा पोलिसांनी खुलासा केला आहे. एका मजुराची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी चक्क शेतात 'हवन' केले आणि त्यानंतर अमानुष छळ करून त्याचा जीव घेतला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रेडा चोरीच्या संशयावरुन मजूराची हत्या
हत्येआधी शेतात हवन अन् नंतर गंगा नदीत अंघोळ करुन 'पाप' धुतले
Crime News : माणुसकीला काळिमा फासणाऱ्या एका खळबळजनक हत्याकांडाचा पोलिसांनी खुलासा केला आहे. एका मजुराची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी चक्क शेतात 'हवन' केले आणि त्यानंतर अमानुष छळ करून त्याचा जीव घेतला. ही थरारक घटना उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात घडली असून, या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
रेडा चोरीच्या संशयावरुन हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, संजय नावाचा मजूर सचिन नावाच्या व्यक्तीकडे कामाला होता. सचिनला संशय होता की संजयने त्याचा रेडा चोरी केला आहे. याच संशयातून सचिनने आपले मित्र अजित, शुभम आणि आकाश यांच्यासोबत मिळून हत्येचा कट रचला. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येपूर्वी या सर्वांनी मिळून शेतात धार्मिक विधी (हवन) केला आणि त्यानंतर संजयवर तुटून पडले.
हे ही वाचा : ब्युटी पार्लरवालीचं सौंदर्य पाहून प्रेमात पडला, शेवटी सगळं काही संपलं; थेट तिच्या दुकानासमोर जाऊन...
पाण्यात बुडवून घेतला जीव
आरोपींनी संजयला बेदम मारहाण केली आणि त्याच्या गुप्तांगावर गंभीर वार केले. एवढ्यावरच न थांबता, नराधमांनी त्याला पाण्याच्या हौदात जबरदस्तीने बुडवले. जोपर्यंत संजयचा श्वास थांबला नाही, तोपर्यंत ते त्याला पाण्यात दाबून धरत होते. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी शेतातच खड्डा खणून त्याचा मृतदेह पुरला आणि तिथून पळ काढला.
हे ही वाचा : लुडो खेळताना दीराने चिमटा काढला, वहिनी थेट रागीट असलेल्या पतीला फोन करणार...इतक्यात भयंकर घडलं
पाप धुण्यासाठी पोहोचले हरिद्वारला
आपले पाप धुण्यासाठी हे चारही आरोपी हत्येनंतर थेट हरिद्वारला पोहोचले आणि तिथे गंगा नदीत स्नान केले. मात्र, पोलिसांच्या तपासापुढे त्यांचे हे 'पाप' लपून राहिले नाही. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सचिन आणि त्याच्या तीन मित्रांना अटक केली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.









