विवाहित महिलेच्या प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने आईची हत्या केली, नंतर भावाला देखील...

मुंबई तक

crime news : विवाहित महिलेच्या प्रेमात वेड्या झालेल्या एका व्यक्तीने आपल्या वृद्ध आई आणि लहान भावावर तलवारीने हल्ला केला. आरोपीने एका महिलेच्या नादाला लागून असं भयंकर कृत्य केलं आहे, यामुळे मोठा वाद उफळला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाने विवाहित महिलेला घरी बोलावले

point

नंतर आईसह कुटुंबाला हाकलून दिले

Crime News : राजस्थानातील अलवर पोलीस ठाणे हद्दीत रुपबास गावात, एका विवाहित महिलेच्या प्रेमात वेड्या झालेल्या एका व्यक्तीने आपल्या वृद्ध आई आणि लहान भावावर तलवारीने हल्ला केला. आरोपीने एका महिलेच्या नादाला लागून असं भयंकर कृत्य केलं आहे, यामुळे मोठा वाद उफळला. अशातच लेकाने आपल्या आईची हत्या केली आणि लहान भावावर हल्ला करून त्याला जखमी केले.  

हे ही वाचा : शाळेत पंख्यावरून वाद, चौथीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला वर्गमित्रांनी ठार मारलं

तरुणाने विवाहित महिलेला घरी बोलावले, नंतर आईसह कुटुंबाला हाकलून दिले

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी गगन सिंगविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. स्थानिकांच्या मते, तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. कुटुंबीयांनी सांगितलं की, गगनने अलीकडेच विवाहित महिलेला आपल्या घरी आणले होते, नंतर त्याने आईसह लहान भावाला आणि त्याच्या कुटुंबीयांना घरातून हाकलून दिले. 

वाद उफळला आणि कान आणि हातावर हल्ला

पीडित कुटुंबाला गेल्या सहा महिन्यांपासून एका पत्राच्या घरात राहण्यास भाग पाडले. कुटुंबाचा आरोप आहे की, त्यांनी सदर पोलीस ठाण्यात आणि पोलीस अधीक्षकांकडे अनेकदा तक्रार दाखल केली, परंतु यामागे कोणतीही कारवाई झाली नाही. बुधवारी सकाळी वाद उफळला आणि गगन सिंगने तलवारीने हल्ला करत मोहन सिंग यांचे कान आणि हातावर हल्ला करत हत्या केली.  

कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यांनुसार, महिलेनं त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला घरी घेऊन आला, तेव्हापासून कुटुंबात सततचा वाद झाला. दररोजच्या वादाने गगनने आपल्या लहान भावासह वृद्ध आईलाही घरातून हकलून दिले होते. संबंधित प्रकरणात सदस्यांचा आरोप असा की, महिला गगनला चिथावणी देते आणि कुटुंबात त्रास निर्माण करण्याचा प्रयत्न करते. 

हे वाचलं का?