दहा वर्षांपूर्वी वडिलांची हत्या, आता आईचा मर्डर करुन मुलाने घरातच जाळला मृतदेह; नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

Crime News : एका मुलाने आपल्या वृद्ध आईची निर्घृण हत्या करुन तिचा मृतदेह घरातच जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने दहा वर्षांपूर्वी आपल्या वडिलांचाही खून केला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

दहा वर्षांपूर्वी वडिलांची हत्या

point

आता आईचा मर्डर करुन मुलाने घरातच जाळला मृतदेह

Crime News : एका मुलाने आपल्या वृद्ध आईची निर्घृण हत्या करुन तिचा मृतदेह घरातच जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने दहा वर्षांपूर्वी आपल्या वडिलांचाही खून केला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील ही घटना आहे.

आरडाओरडा करुनही मदतीला कोणी आले नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामजन बरजो असे आरोपी मुलाचे नाव असून त्याने आपली आई मेरी बरजो हिच्यावर सोमवारी प्रथम काठीने हल्ला केला. त्यानंतर एका धारधार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. ही घटना घडली तेव्हा गावातील बहुतांश लोक जवळच्याच एका बाजारात गेले होते. आरोपीच्या वहिनीने हा प्रकार पाहून आरडाओरडा केला आणि लोकांना बोलावण्याचा प्रयत्न केला, मात्र गावात कोणीही नसल्याने मदतीसाठी वेळेवर कोणी पोहोचू शकले नाही. याचाच फायदा घेत आरोपीने पुरावा मिटवण्यासाठी घरामागील मोकळ्या जागेत मृतदेह जाळला.

हे ही वाचा : 'देवा भाऊ तुम्ही शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला...', कोण संतापलं एवढं?

 

दहा वर्षांपूर्वी वडिलांचीही हत्या

तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या दाव्यानुसार, आरोपी नामजन याने सुमारे 8-10 वर्षांपूर्वी आपल्या वडिलांचीही अशाच प्रकारे हत्या केली होती. त्यावेळी त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे निष्पन्न झाले होते, त्यामुळे त्याला रांची येथील मानसिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर तो पुन्हा गावात आला होता, मात्र आता त्याने पुन्हा आपल्या जन्मदात्या आईचा बळी घेतल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : अशोक खरातच्या दहावीच्या रिझल्टची कॉपी समोर, पाहा किती विषयात नापास? कोणत्या विषयात किती मार्क? Photo

 

डीएनए चाचणी होणार

घटनेनंतर आरोपी फरार झाला असून तो शेजारच्या जिल्ह्यात पळून गेल्याचा संशय आहे. झारखंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून विविध पथके त्याच्या शोधात रवाना केली आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून जळालेले अवशेष जप्त केले असून ते डीएनए चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. आरोपीला लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 

हे वाचलं का?