भाजप नगरसेवकाच्या मुलाने अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले, अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची दिली धमकी
crime news : भाजप नगरसेवकाच्या मुलाने अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ बनवून व्हायरल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणात दोन मुली बळी ठरल्याची माहिती समोर आली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजप नगरसेवकाच्या मुलावर मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप
आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा
Crime News : गोव्यात लाज आणणारी घटना घडल्याचे वृत्त आहे. भाजप नगरसेवकाच्या मुलाने अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ बनवून व्हायरल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणात दोन मुली बळी ठरल्याची माहिती समोर आली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास गुन्हे शाखेकडे पाठवण्यात आला. संबंधित प्रकरण गोव्यातील कुशावती जिल्ह्यातील कुडचोरेम भागातील असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : फडणवीस सरकारनेही अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला दिला होता निधी; किती कोटी मोजले? 2018 चा शासन निर्णय
भाजप नगरसेवकाच्या मुलावर मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप
संबंधित तरुण हा गोव्याचे भाजपचे नगरसेवक सुशांत नाईक यांचा मुलगा सोहम नाईक असल्याचे सांगितलं जात आहे. या प्रकरणात त्याने अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप आहे. दोन अल्पवयीन मुलींनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या खुलाशाने परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे, या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध पॉक्सो कायदा आणि गोवा बाल कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. अशातच, या व्यतिरिक्त भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. कायद्यानुसार, आरोपीवर मुलांचे लैंगिक शोषणासह गंभीर आरोप करण्यात आले. पोलिसांनी सांगितलं की, संबंधित प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला 22 मार्च रोजी अटक केली.
अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसरात तणाव
तसेच 21 मार्च रोजी, अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर, स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्याबाहेर जमले आणि त्यांनी आंदोलन सुरु करण्यात आले. पोलिसांनी सुरुवातीला कारवाई करण्यास विलंब केल्याचा त्यांनी आरोप केला. मात्र, वाढत्या दबावाखाली पोलिसांनी आरोपीला अटक केली.









