'8 महिलांचे 35 व्हिडिओ, अशोक खरातने भोंदूगिरी करून महिलांवर केले बलात्कार', फडणवीसांनी सभागृहात सगळंच सांगितलं
Devendra Fadanvis : 'व्हिडिओत एकूण 8 महिलांचे 35 व्हिडिओ असल्याचे समोर आले. त्या व्हिडिओत अशोक खरातने भोंदूगिरी आणि जादूटोणा, तंत्रमंत्र वापरून अनेक महिलांशी बलात्कार तसेच अश्लील चाळे केल्याचे दिसून आले', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलून दाखवली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'फोटो व्हायरल करू नये म्हणून 5 कोटींची खंडणी मागितली'
'अशोक खरात यांच्या मोबाईल तपासातून कोणताही पुरावा आढळून आला नाही'
Devendra Fadanvis : 'निरज जाधव यांचा शोध घेताना अशोक खरात यांच्या संबंधित योगेश भालेराव या साक्षीदाराने त्या व्हिडिओत एकूण 8 महिलांचे 35 व्हिडिओ असल्याचे समोर आले. त्या व्हिडिओत अशोक खरातने भोंदूगिरी आणि जादूटोणा, तंत्रमंत्र वापरून अनेक महिलांशी बलात्कार तसेच अश्लील चाळे केल्याचे दिसून आले', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलून दाखवली होती.
हे ही वाचा : निलम गोऱ्हेंनी निर्देश दिले, पण साताऱ्याच्या एसपींचं निलंबन होणार की नाही? देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
'फोटो व्हायरल करू नये म्हणून 5 कोटींची खंडणी मागितली'
एफआरआय वाचून दाखवताना त्यांनी नाशिकमध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती दिली. 'मनाजी परब याने त्याच्या मोबाईलवरून व्हॅट्सअॅपवरून फिर्यादीच्या मोबाईलवर एका महिलेचे फोटो प्रसारित करून सदरचे फोटो व्हायरल करेन,' असे सांगितले. नंतर ते फोटो व्हायरल करू नये असे सांगून पाच कोटी रुपये खंडणी मागितली होती'.
'अशोक खरात यांच्या मोबाईल तपासातून कोणताही पुरावा आढळून आला नाही'
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'संबंधित फोटो दिनेश परब यांना राजेंद्र जासूदने दिले असल्याची तक्रार दिली होती. यावरून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 468 भारतीय न्यायसंहिता 2025, 2023 कलम 308 (2) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कलम प्रमाणे दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा नाशिक पोलिसांनी केला असता, फिर्यादी अशोक खरात यांचा मोबाईल तपासला असता, त्यातून कोणताही पुरावा आढळून आला नाही'.
'फिर्यादीचा कोणाताही पुरावा आढळून आला नाही'
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, 'तपास कामात फिर्यादी अशोक कुमार खरात यांचे व्हॅट्सअॅप मेसेजेस आणि कॉलसाठी लागणारे नंबरचे स्क्रिनशॉट काढण्यात आले आणि ते जप्त केलेत. फिर्यादीने सांगितलेल्या फिर्यादीचा कोणाताही पुरावा आढळून आला नाही. आरोपी दिनेश परब यांना माननिय उच्च न्यायालयातून अंतरिम जामीन आणि राजेंद्र जासूद यांना जिल्हान्यायालय नाशिक यांना अटकपूर्व जामीन मंजूर आहे. निरज जाधव यांच्या तपासात कोणताही दोष आढळून आला नाही. त्याच्या सहभागाबाबत तपास सुरु आहे. ही तक्रार करण्यात आली होती'.









