'..,तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही', महाराष्ट्रातील अंतर्गत रेल्वेगाड्या रद्द करुन परप्रांतियांना प्राधान्य दिल्याने मनसेचा इशारा
Raj Thackeray MNS warns : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वात मनसेच्या प्रतिनिधीमंडळाने रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन दादर–रत्नागिरी पॅसेंजर सेवा बंद करून तिच्या जागी दादर–गोरखपूर रेल्वे सुरू करण्याच्या निर्णयावर कडक नाराजी व्यक्त केली. या निर्णयाकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कोकणातील नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कठोर आंदोलन छेडावे लागेल, असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'..,तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही',
महाराष्ट्रातील अंतर्गत रेल्वेगाड्या रद्द करुन परप्रांतियांना प्राधान्य दिल्याने मनसेचा इशारा
Raj Thackeray MNS warns : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत दादर–रत्नागिरी रेल्वे पॅसेंजर सेवा रद्द करून तिच्या ऐवजी दादर–गोरखपूर रेल्वे सुरू करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. या निर्णयाची रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कोकणवासीयांना दिलासा द्यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट इशाराही यावेळी प्रशासनाला देण्यात आला.
मनसेने रेल्वे प्रशासनाला दिलेल्या पत्रात काय म्हटलं?
मागील काही काळापासून महाराष्ट्रातील अंतर्गत रेल्वे गाड्या रद्द करून परराज्यातील गाड्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. कोविड काळात मुंबई कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, मुंबई मनमाड गोदावरी एक्सप्रेस, पुणे भुसावळ पॅसेंजर, पंढरपुर एक्सप्रेस यासारख्या असंख्य रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, ज्या नंतर पुन्हा सुरू करण्यात आल्याच नाहीत. त्या वेळापत्रकात आता परराज्यात जाणाऱ्या गाड्या सोडण्यात येत आहेत.
महाराष्ट्रातील अंतर्गत गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे त्यातच आता पुन्हा दादर रत्नागिरी गाडी रद्द करण्यात आली असून त्याजागी दादर गोरखपूर गाडी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रचंड संख्येने कोकणात प्रवास करणाऱ्या मुंबईकर व कोकण वासियांची फार मोठी गैरसोय होणार आहे. कोकण वासियांना व महाराष्ट्रातील जनतेला डावलून परराज्यातील प्रवाशांना प्राधान्य देणे हा दुजाभाव रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केला जात असून त्याचा आम्ही निषेध करतो. या सर्व प्रकारामुळे महाराष्ट्रातील जनतेत प्रचंड नाराजी व असंतोष पसरला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रहाची मागणी करीत आहे की, दादर रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत दादर स्थानक देवून सोडण्यात यावी, तसेच याआधी रद्द केलेल्या इतरही गाड्याही पुन्हा सुरु कराव्या, अन्यथा स्थानिक जनतेच्या असंतोषाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही कृपया रेल्वे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन कोकण वासियांना दिलासा द्यावा अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, याची नोंद घ्यावी.









