भयंकर... “भोंदूबाबा अशोक खरात राजकारण्यांना अल्पवयीन मुली पुरवत होता, अन् स्वत:ही...”

मुंबई तक

भोंदूबाबा अशोक खरात हा राजकारणी नेत्यांना अल्पवयीन मुली पुरवत होता. असा अत्यंत गंभीर आरोप RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

कृष्णा पांचाळ, पुणे: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आरटीआय कार्यकर्ते आणि माहिती अधिकार अभियानाचे नेते विजय कुंभार यांनी मुंबई Tak सोबत बोलताना अत्यंत गंभीर आरोप करत खरातचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचा दावा केला आहे. “अशोक खरात हा राजकारण्यांना अल्पवयीन मुली पुरवत होता,” असा थेट आणि खळबळजनक आरोप कुंभार यांनी केला. या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

'रुपाली चाकणकरांना अटक झाली पाहिजे'

विजय कुंभार यांनी याच मुलाखतीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी अनामिकेच्या जखमेबाबत दिलेल्या स्पष्टीकरणावरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “या प्रकरणाची माहिती रुपाली चाकणकर यांना आधीपासून होती, तरी त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. चाकणकर यांना अटक व्हायला पाहिजे. सुमारे वर्ष-दीड वर्ष त्यांना हा सगळा प्रकार माहिती होता. तरीही त्या चाकणकर बाई त्या बाबाचे उदात्तीकरण करत होत्या. आपले त्याचे चांगले संबंध आहेत.. बाकी सगळं जाऊ द्या.. ते आहेच.. परंतु आता माहिती असताना देखील त्या गप्प राहिल्या. याचा अर्थ त्यांनी या बाबाच्या गुन्ह्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. मी तर म्हणेन त्यांच्या या गुन्ह्यात त्या सामील होत्या. त्यामुळे त्यांना अटक झालीच पाहिजे. ” असा आरोप करत कुंभार यांनी चाकणकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा>> भोंदूबाबा अशोक खरात याला रुपाली चाकणकर चक्क 'या' नावाने मारायच्या हाक, कोणी केला दावा?

कुंभार यांनी स्पष्ट केले की, वर्षभरापूर्वीच अशोक खरात यांच्या गैरकृत्यांची तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आली होती. मात्र आयोगाने खरातवर कारवाई करण्याऐवजी बातमी प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पत्र काढले होते. “महिला आयोग भोंदूबाबाला पाठीशी घालत होता का?” असा प्रश्न कुंभार यांनी उपस्थित केला.

या सगळ्या आरोपांबाबत विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही पाठवले असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. “रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवणे पुरेसे नाही; त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.

हे वाचलं का?