भोंदूबाबा अशोक खरात याला रुपाली चाकणकर चक्क 'या' नावाने मारायच्या हाक, कोणी केला दावा?
तृप्ती देसाई यांनी रूपाली चाकणकरांवर सडकून टीका केली आहे. रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या आहारी गेल्या होत्या त्यामुळेच त्यांनी खरातवरील आरोपांबाबत कधी चौकशी केली नाही असा दावा तृप्ती देसाईंनी केला आहे.
ADVERTISEMENT

सिन्नर: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर या सध्या प्रचंड चर्चेत आहेत. आता त्याच चाकणकरांवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी जोरदार निशाणा साधला आहे. खरात या गुरूवर शोषणाचे गंभीर आरोप समोर आल्यानंतरही त्यांना पाठिंबा देण्याच्या चाकणकर यांच्या भूमिकेबद्दल तृप्ती देसाई यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. “एखादा गुरू करणं, त्याला नतमस्तक होणं यात वाईट काहीच नाही, पण तो चुकीचं काही करत असेल आणि हे तुम्हाला माहीत असेल तर त्याला पाठिशी घालण्याचं काम तुम्ही का केलं?” असा थेट सवाल करत तृप्ती देसाई यांनी चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
'रुपाली चाकणकर खरातला पप्पा म्हणायचा...'
तृप्ती देसाई यांनी आज (24 मार्च) सिन्नरमधील मिरगाव येथे जाऊन ईशान्येश्वर मंदिराची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'जेव्हा-जेव्हा खरातच्या प्रकरणातील खरे विषय समोर आले, तेव्हा रूपाली चाकणकर यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही एकदाही विचारलं नाही की, शोषण झालंय का? अशा पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत तर खरातने खरंच हे केलंय का? याची चौकशी का केली नाही?” असं म्हणत त्या पुढे म्हणाल्या की, ''चाकणकर यांनी ट्रस्टवर राहायचं की नाही याचा विचारही केला नाही. त्या एवढ्या आहारी गेल्या होत्या की, माझ्या माहितीप्रमाणे त्या खरातला ‘पप्पा’ म्हणायच्या. आणि मग जे ‘पप्पा’ आहेत तुमचे, त्या पप्पाने काही केलं तरी चालतं का?” असा थेट सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा>> भोंदूबाबा खरातचं सगळ्यात घाणेरेडं कृत्य, 'शंकराच्या पिंडीजवळ देखील महिलांना घेऊन...', 'ती' गोष्ट ऐकून तुम्हीही जाल हादरून!
तृप्ती देसाई यांनी आरोप केला की, चाकणकर यांचा प्रयत्न ‘पप्पा’ना वाचवण्याचा आहे. “आता पप्पांना भेटायला तुम्ही जेलमध्ये येणार आहात का? तुम्ही सोयीचं राजकारण करू नका. महिलांना न्याय देणं महत्त्वाचं आहे,” असं म्हणत त्यांनी चाकणकर यांच्या भूमिकेला ‘सोयीचं राजकारण’ म्हटलं.
रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ?
तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केलं की, त्यांचं एकच टार्गेट होतं आणि आहे, ते म्हणजे या प्रकरणात गुन्हा दाखल करणं आणि खरातला बेड्या पडणं आणि आता खरातला शिक्षा होणं व पीडितांना न्याय मिळणं..









