अजितदादांच्या विमान अपघाताबाबत देवेंद्र फडणवीस यांनी दिली 57 दिवसानंतर महत्त्वाची अपडेट, पायलटबाबत म्हणाले...

मुंबई तक

Ajit Pawar plane cash : राज्याचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला काही महिने झाले आहेत. अशातच शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार अमोल मिटकरी यांनी अजितदादांच्या विमान अपघातावरून सरकारला अनेक सवाल केले. या प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 57 दिवसानंतर निवेदन जारी केले आहे.

ADVERTISEMENT

Ajit Pawar plane cash
Ajit Pawar plane cash
google news

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

point

वैमानिकांच्या शिफ्ट नियुक्तीबाबत काय? 

Ajit Pawar plane Accident : राज्याचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला काही महिने झाले आहेत. अशातच शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार अमोल मिटकरी यांनी अजितदादांच्या विमान अपघातावरून सरकारला अनेक सवाल केले. या प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 57 दिवसानंतर निवेदन जारी केले आहे. 

हे ही वाचा : फडणवीस सरकारनेही अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला दिला होता निधी; किती कोटी मोजले? 2018 चा शासन निर्णय

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

फडणवीस म्हणाले की, 'बारामती विमानतळावर विमान लँड होण्याआधी ही दुर्दैवी घटना घडली होती. अजित पवार यांच्या अपघाताचा सीआयडीकडून पुढील तपास सुरु आहे. तपासातून पायलटची अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली. अजित पवार यांच्या विमानाच्या पायलटची नेमणूक ही 27 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता झाली होती'. ते म्हणाले की, 'विमान उड्डाणापूर्वी मुख्य वैमानिक आणि सह-वैमानिक या दोघांचीही 'ब्रीथ ॲनालायझर' चाचणी करण्यात आली होती. अजित पवार सकाळी 7.52 वाजता विमानतळावर पोहोचले. मुंबई आणि बारामती या दोन्ही विमानतळांवरील सीसीटीव्ही फुटेज जमा करण्यात आले आहे'.

'व्हिसेरा अंतर्गत अहवालात कोणतेही विष किंवा संशयास्पद घटक आढळले नाहीत'

तसेच, 'मृत्यूचे कारण हे अनैसर्गिक नोंदवले गेले, विमान अपघातात झालेल्या जखमी आणि शरीरावरील अनेक दुखापतींमुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. अजित पवार यांचा मृतदेह त्यांच्याच नातेवाईकांचा आहे, याची खात्री करण्यासाठी DNA चाचणी करण्यात आली आणि त्याचे निष्कर्ष देखील जुळले, VSR अंतर्गत अहवालात शरीरात कोणतेही विष किंवा संशयास्पद घटक आढळून आलेले नाहीत', असे ते म्हणाले.

हे ही वाचा : मोठी बातमी : रुपाली चाकणकरांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवा, राष्ट्रवादीतील महिला नेत्या कडाडल्या, थेट सूनेत्रा पवारांना पत्र

वैमानिकांच्या शिफ्ट नियुक्तीबाबत काय? 

'कॅप्टन राहुल ओबेरॉय आणि दिलीप सिंग यांना विमान उड्डाणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, पोटदुखीच्या कारणाने राहुल ओबेरॉय यांनी उड्डाण करण्यास नकार दिला, त्यानंतर सुमित कपूर आणि शंभावी पाठक या अन्य वैमानिकांची नियुक्ती करण्यात आली. वैमानिक आणि सह वैमानिकांच्या नियुक्तीमध्ये अंतिमक्षणी कोणताही बदल करण्यात आला नव्हता,' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

हे वाचलं का?