टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने केली सर्वात मोठी घोषणा, Instagram वरूनच...

मुंबई तक

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय आज (7 मे) जाहीर केला आहे. रोहित कसोटीतून निवृत्त होणार असला तरी वनडे क्रिकेटमध्ये मात्र खेळणार आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याने आज (7 में) कसोटी क्रिकेटमधून (Test Match) निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, तो आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यांमध्ये खेळणार आहे. 38 वर्षीय रोहितने नुकतीच ही घोषणा केली आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत त्याच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहितच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

रोहितची कसोटी कारकीर्द

या निर्णयामुळे रोहित शर्माच्या 11 वर्षांच्या कसोटी कारकीर्द आता संपुष्टात आली आहे. रोहितने 67 कसोटी सामने खेळले, त्यापैकी 23 कसोटींमध्ये त्याने कर्णधारपद भूषवले. त्याने 40.57 च्या सरासरीने एकूण 4302 धावा केल्या ज्यामध्ये 12 शतकं आणि 18 अर्धशतकं समाविष्ट आहेत. रोहितने कसोटी सामन्यात 88 षटकार आणि 473 चौकार मारले.

हे ही वाचा>> Who is Avneet Kaur: कोण आहे ही अवनीत? जिच्यामुळे विराट कोहलीचा टप्प्यातच कार्यक्रम झालाय!

2010 मध्ये नागपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित कसोटी पदार्पण करणार होता, पण त्या सामन्यात नाणेफेकीच्या काही क्षण आधी त्याला एक दुखापत झाली. यानंतर त्याचे कसोटी पदार्पण हे तीन वर्षांनी झाले. 2013 मध्ये कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्याच्या पदार्पणाच्या कसोटीत त्याने शतक झळकावले. मुंबईत झालेल्या त्याच्या पुढच्या कसोटीत त्याने आणखी एक शतक झळकावले. त्याच वेळी, रोहितने त्याचा शेवटचा कसोटी सामना 26 डिसेंबर 2024 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला होता.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp