Who is Avneet Kaur: कोण आहे ही अवनीत? जिच्यामुळे विराट कोहलीचा टप्प्यातच कार्यक्रम झालाय!
Virat Kohli: भारताचा क्रिकेटर विराट कोहली हा एका अभिनेत्रीचा फोटो लाइक केल्यामुळे सध्या बराच ट्रोल केला जात आहे. पण ती नेमकी अभिनेत्री कोण? हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोण आहे अवनीत कौर? जिचा फोटो किंग कोहलीने केला होता लाईक

विराट कोहलीने अवनीत कौरबाबत दिली स्पष्टोक्ती

विराट आणि अवनीत कौरची सोशल मीडियावर चर्चा
Avneet Kour: क्रिकेट विश्वातील किंग म्हणून विराट कोहलीची ओळख आहे. तो त्याच्या शौलीसाठी, त्याच्या कौटुंबिक जीवनासाठी आणि खेळाबाबत नेहमी चर्चेत असतो. मात्र, आता त्याच्यामुळे एक अभिनेत्री चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर अभिनेत्रीच्या एका फॅन पेजला विराट कोहलीने लाईक केले. या किरकोळ कृतीवरून सोशल मीडियावर मोठा गाजावाजा झाला आहे. आता हे फॅन पेज इतर कोणाचे नसून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौरचं होतं. यावरून चक्क विराट कोहलीला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
विराट कोहलीने सोशल मिडिया हँडलवर संबंधित प्रकरणावर स्पष्टोक्ती दिली आहे. त्याने लिहिले की, मी सांगू इच्छितो की, "माझे फिड क्लिअर करताना हा प्रकार घडला. त्यावेळी अल्गोरिदममुळे इंटरअॅक्शन रजिस्टर्ड झालं असावं. काहीही हेतूपूर्वक नव्हतं. त्यामुळे विनाकारण कोणतेही तर्क-वितर्क लावू नका. आपण समजून घ्याल, धन्यवाद!", अशी स्टोरी शेअर करत विराटने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
हे ही वाचा>> IPL 2025: 35 चेंडूत 100 धावा करणारा 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मराठी आहे?
दरम्यान, या प्रकरणावरून सोशल मीडियावर निरर्थक चर्चा सुरू झाली होती. काही चाहत्यांनी विराट कोहलीने अभिनेत्रीच्या पेजला लाईक केलेले स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले. हा प्रकार विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्काच्या वाढदिवशी 1 मे 2025 रोजी घडला.

कोण आहे अभिनेत्री अवनीत कौर?
13 ऑक्टोबर 2001 रोजी पंजाबमधील जालंधर येथे जन्मलेल्या अवनीत कौर वयाच्या 8व्या वर्षापासून मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. तिने 2010 मध्ये 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स' मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि 'डान्स के सुपरस्टार्स' मध्येही भाग घेतलेला. तिचा टीव्हीवरील अभिनय प्रवास 2012 मध्ये 'मेरी माँ' या मालिकेने सुरू झाला. यानंतर ती 'झलक दिखला जा', 'सावित्री एक प्रेम कहानी' आणि 'एक मुठ्ठी आसमान' सारख्या शोमध्ये दिसली.