IPL 2022, CSK vs KKR : श्रेयस विरुद्ध जाडेजा; कुणाचा संघ भारी, आकडे काय सांगतात? - Mumbai Tak - ipl 2022 csk vs kkr match chennai super kings head to head record against kolkata knight riders - MumbaiTAK
बातम्या स्पोर्ट्स

IPL 2022, CSK vs KKR : श्रेयस विरुद्ध जाडेजा; कुणाचा संघ भारी, आकडे काय सांगतात?

भारतीय क्रिकेटचं विश्व बदलून टाकणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरू होत आहे. आयपीएलमधील पहिलाच सामना अशा दो संघात आहे, जे मागील स्पर्धेत फायनलमध्ये आमने-सामने आले होते. अर्थात आतापर्यंत ते संघ तुमच्या लक्षात आले असतील… चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स! मागील आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत विजेतेपद पटकावलं […]

भारतीय क्रिकेटचं विश्व बदलून टाकणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरू होत आहे. आयपीएलमधील पहिलाच सामना अशा दो संघात आहे, जे मागील स्पर्धेत फायनलमध्ये आमने-सामने आले होते. अर्थात आतापर्यंत ते संघ तुमच्या लक्षात आले असतील… चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स!

मागील आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत विजेतेपद पटकावलं होतं. यावेळच्या आयपीएलमध्येही चेन्नई सुपर किंग्जने पूर्वीच्या महत्त्वाच्या खेळाडूंना रिटेन केलेलं आहे. स्पर्धेला दोन दिवस शिल्लक असतानाच धोनीने चेन्नईचं कर्णधारपद सोडल्यानं ही जबाबदारी आता अष्टपैलू रविंद्र जाडेजावर आलेली आहे. त्यामुळे जाडेजाच्या नेतृत्वाची पहिल्याच सामन्यात कसोटी असणार आहे.

दरम्यान, दोन्ही संघात झालेल्या सामन्यांची आकडेवारी बघितली, तर कोलकाता नाईट रायडर्सपेक्षा चेन्नई सुपर किंग्ज पारडं जड आहे. कोलकाता नाईट रायडर्सने दोन वेळा विजेतेपद पटकावलेलं आहे. तिसऱ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरण्याच्या इराद्याने केकेआर मैदानात उतरेल. केकेआर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळत असून, यापूर्वी श्रेयसने दिल्लीचं नेतृत्व केलेलं आहे.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हेड टू हेड

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आतापर्यंत एकूण २५ सामने झाले आहेत. यापैकी चेन्नई सुपर किंग्जने १७ सामन्यात विजय मिळवलेला असून, कोलकाता नाईट रायडर्सला केवळ ८ सामन्यातच विजय मिळवता आलेला आहे.

सरासरी धावसंख्या

चेन्नई सुपर किंग्ज -१५८

कोलकाता नाईट रायडर्स – १५४

सर्वाधिक धावसंख्या

सीएसके – २२०

केकेआर -२०२

सर्वात कमी धावसंख्या

सीएसके -११४

केकेआर -१०८

सर्वाधिक धावा

सुरेश रैना -८२९

एमएस धोनी -५०१

अंबाती रायडू -४२८

फाफ डुप्लेसी -४३७

रॉबिन उथप्पा – ३४९

सर्वाधिक बळी

पवन नेगी – ५/२२

रविंद्र जाडेजा – ४/१२

मखाया एंटिनी -४/२१

आशिष नेहरा – ४/२१

इमरान ताहिर – ४/२७

सर्वाधिक धावांनी विजय

चेन्नई सुपर किंग्ज -पंजाब विरुद्ध – ९७ धावा

कोलकाता नाईट रायडर्स -बंगळुरू विरुद्ध – १४० धावा

आयपीएलच्या या सत्रामध्ये होऊ शकतात मोठे विक्रम…

महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमध्ये ५००० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या गटात सहभागी होण्यासाठी २५४ धावांची गरज आहे. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत २२० सामन्यांत एकूण ४,७४६ धावा केल्या आहेत.

अंबाती रायडूला ४००० धावा पूर्ण करण्यासाठी केवळ ८४ धावांची आवश्यकता आहे. रायडूने आयपीएलमध्ये १७५ सामन्यांमध्ये ३,९१६ धावा केल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडून ड्वेन ब्रावोने १५१ सामन्यांत १६७ गडी बाद केले आहेत. त्याने आणखी ४ गडी बाद केले, तर १७० बळीबरोबर तो आयपीएलमध्ये सर्वाधिक गडी बाद करणार खेळाडू ठरेल.

केकेआरचा सुनील नरेनला १५० विकेट्सचा पल्ला गाठण्यासाठी ७ गडी बाद करण्याची गरज आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत पाच गोलंदाजांनाच ही कामगिरी करता आलेली आहे. यात लसिथ मलिंगा १७० बळी, ड्वेन ब्रावो १६८ गडी, अमित मिश्रा १६६ बळी, पीयूष चावला १५७ बळी आणि हरभजन सिंग १५० बळी.

चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या चारही सामन्यात विजय मिळवलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 3 =

अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी! ‘ही’ 5 पानं आहेत दीर्घायुष्याचं वरदान!