IPL 2022 : छोटा पॅकेट बडा धमाका, महागडा खेळाडू इशान किशनने केली दिल्लीच्या बॉलर्सची धुलाई

मुंबई तक

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आपला पहिला सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने दिल्लीविरुद्ध ५ विकेट गमावत १७७ धावांपर्यंत मजल मारली आहे. यंदाच्या हंगामात सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या इशान किशनने धडाकेबाज अर्धशतक झळकावत स्वतःची निवड सार्थ ठरवली आहे. किशनने ४८ बॉलमध्ये ११ फोर आणि २ सिक्स लगावत नाबाद ८१ धावा केल्या. इशान किशनच्या याच खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीविरुद्ध पहिल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आपला पहिला सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने दिल्लीविरुद्ध ५ विकेट गमावत १७७ धावांपर्यंत मजल मारली आहे. यंदाच्या हंगामात सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या इशान किशनने धडाकेबाज अर्धशतक झळकावत स्वतःची निवड सार्थ ठरवली आहे. किशनने ४८ बॉलमध्ये ११ फोर आणि २ सिक्स लगावत नाबाद ८१ धावा केल्या.

इशान किशनच्या याच खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीविरुद्ध पहिल्या सामन्यात १७७ धावांपर्यंत मजल मारली. या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इशान किशनने अनेक विक्रम आपल्या नावावर जमा केले आहेत.

रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी इशान किशनने ६७ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर ठराविक अंतराने मुंबईचे एक-एक फलंदाज माघारी परतत राहिले. परंतू इशान किशनने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली.

IPL 2022 : मुंबईकर हिटमॅनची अव्वल स्थानाकडे वाटचाल, जाणून घ्या रोहितने केलेल्या विक्रमाविषयी

हे वाचलं का?

    follow whatsapp