अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या ताफ्यात; बहीण सारा म्हणते…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत आणि जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या सिझनचा लिलाव चेन्नईत पार पडलं. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सने २० लाखांची बोली लावत आपल्या संघात दाखल करुन घेतलंय. तब्बल ८ तास चाललेल्या लिलावात अर्जुन तेंडुलकरचं नाव सर्वात शेवटी घेण्यात आलं. यावेळी मुंबईने त्याला तात्काळ आपल्या संघात दाखल करुन घेतलं.

दरम्यान अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर बहीण सारा तेंडुलकरने त्याचं अभिनंदन केलंय. साराने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर अर्जुनबरोबरचा एक फोटो शेअर केला असून त्याच्यासाठी खास मेसेज लिहीला आहे. सारा म्हणते, “हे यश तुझ्यापासून कुणीही हिरावू शकत नाही. हे यश तुझं असून मला तुझा अभिमान आहे.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अर्जुन तेंडुलकरने देखील यासंदर्भात त्याची प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “मी लहानपणापासून मुंबई इंडियन्सचा खूप मोठा फॅन. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी कोच, सपोर्ट स्टाफ आणि टीमच्या मालकांचे आभार मानतो. मुंबई पलटनमध्ये सहभागी होण्यास मी फारच उत्सुक आहे. ब्लू आणि गोल्ड जर्सीची घालण्याची आतुरतेने वाट पाहतोय.”

आयपीएलच्या लिलावादरम्यान अर्जुन तेंडुलकरवर इतर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. तर अर्जुन तेंडुलकरची आयपीएल लिलावासाठी निवड झाल्यानंतर अर्जुनला आणि त्याचा सचिन तेंडुलकरला सोशल मीडियावर अनेकजणांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT