पहिल्याच सामन्यात भारताला दुखापतींचं ग्रहण, दोन महत्वाचे प्लेअर मैदानाबाहेर

मुंबई तक

शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल आणि कृणाल पांड्या यांच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात ३१७ रन्सपर्यंत मजल मारली. यानंतर इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली. परंतू प्रसिध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेत इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल आणि कृणाल पांड्या यांच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात ३१७ रन्सपर्यंत मजल मारली. यानंतर इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली. परंतू प्रसिध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेत इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं.

परंतू या दरम्यान भारतीय संघाला दोन धक्के बसले आहेत. श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा यांना फिल्डींग दरम्यान दुखापत झाल्यामुळे त्यांना मैदानाबाहेर जावं लागलं. श्रेयस अय्यरला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असून BCCI ची मेडीकल टीम त्याला स्कॅनिंगसाठी बाहेर नेण्यात आलं. रोहित शर्मालाही बॅटिंगदरम्यान दुखापत झाल्यामुळे तो नंतर मैदानात आला नाही.

दरम्यान टीम इंडियाकडून वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कृणाल पांड्याने हाफ सेंच्युरी झळकावत आपली निवड योग्य असल्याचं सिद्ध केलं. कृणालने ३१ बॉलमध्ये ७ फोर आणि २ सिक्स लगावत नॉटआऊट ५८ रन्स केल्या.

आपलं पहिलं अर्धशतक वडिलांना समर्पित करत असताना कृणालच्या अश्रुंचा बांध फुटला आणि तो मैदानातच रडू लागला. यानंतर कृणालचा इंटरव्ह्यूही रद्द करण्यात आला. यानंतर भावूक झालेल्या आपल्या भावाला मिठी मारत हार्दिक पांड्याने त्याचं सांत्वन केलं.

सातव्या क्रमांकावर बॅटींगसाठी आलेल्या कृणाल पांड्याने इंग्लंडच्या बॉलिंग लाईनअपचा चांगलाच समाचार घेतला. ३१ बॉलमध्ये ७ फोर आणि २ सिक्स लगावत कृणालने ५८ रन्सची इनिंग खेळली. याव्यतिरीक्त शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल यांनीही हाफ सेंच्युरी करत संघाची बाजू वरचढ करण्यात मोलाची भूमिका बजावली.

Ind vs Eng : पहिल्याच वन-डे मॅचमध्ये कृणालची हाफ सेंच्युरी, दिग्गज प्लेअर्सच्या पंगतीत स्थान

हे वाचलं का?

    follow whatsapp