टीम इंडियाला मोठा धक्का, खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर वन-डे सिरीजमधून बाहेर

मुंबई तक

पहिल्या वन-डे सामन्यात इंग्लंडवर ६६ रन्सनी मात करुन सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यर खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. इंग्लंडविरुद्ध पहिल्या मॅचमध्ये फिल्डींग करत असताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. ESPNCricinfo ने यासंदर्भातली बातमी दिली आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव किंवा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पहिल्या वन-डे सामन्यात इंग्लंडवर ६६ रन्सनी मात करुन सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यर खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. इंग्लंडविरुद्ध पहिल्या मॅचमध्ये फिल्डींग करत असताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. ESPNCricinfo ने यासंदर्भातली बातमी दिली आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव किंवा शुबमन गिलला टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फिल्डींगदरम्यान झालेल्या दुखापतीनंतर श्रेयस अय्यरला मैदानाबाहेर नेण्यात आलं होतं. यानंतर त्याला झालेल्या दुखापतीचं स्कॅनिंग करण्यात आलं. गेल्या सहा महिन्यांमध्ये अय्यरचा खांदा दुखावण्याची ही दुसरी वेळ आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध लिमीटेड ओव्हरची सिरीज खेळल्यानंतर श्रेयस भारतात आला. यानंतर झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे तो मुंबईकडून सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खेळू शकला नव्हता.

बाबा, ही इनिंग खास तुमच्यासाठी!

इंग्लंडविरुद्ध वन-डे सिरीजसाठी भारतीय संघात दाखल होण्याआधी श्रेयस विजय हजारे ट्रॉफीत ४ सामने खेळला होता. ज्यातील दोन सामन्यांत त्याने शतक झळकावलं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे श्रेयसने Royal England Cup साठी लँकशायर टीमसोबत करार केला होता. या स्पर्धेत खेळण्याआधीच श्रेयसला खांद्याच्या दुखापतीमुळे पुन्हा एकदा आपलं संघातलं स्थान गमवावं लागलं आहे. श्रेयस आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं प्रतिनिधीत्व करतो.

Ind vs Eng : पहिल्याच वन-डे मॅचमध्ये कृणालची हाफ सेंच्युरी, दिग्गज प्लेअर्सच्या पंगतीत स्थान

हे वाचलं का?

    follow whatsapp