अजिंक्य रहाणे वळला पुन्हा स्थानिक क्रिकेटकडे, सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत करणार मुंबईचं नेतृत्व
गेल्या काही वर्षांपासून भारताच्या कसोटी संघापुरता मर्यादीत राहिलेल्या अजिंक्य रहाणेने पुन्हा एकदा आपला मोर्चा स्थानिक क्रिकेटकडे वळवला आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत अजिंक्य मुंबईच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. MCA च्या निवड समितीने या स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. ४ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धे खेळवली जाणार आहे. सलिल अंकोला यांच्या निवड […]
ADVERTISEMENT
गेल्या काही वर्षांपासून भारताच्या कसोटी संघापुरता मर्यादीत राहिलेल्या अजिंक्य रहाणेने पुन्हा एकदा आपला मोर्चा स्थानिक क्रिकेटकडे वळवला आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत अजिंक्य मुंबईच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. MCA च्या निवड समितीने या स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
४ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धे खेळवली जाणार आहे. सलिल अंकोला यांच्या निवड समितीने मुंबईच्या २० सदस्यीय संघाची घोषणा केली असून अजिंक्यसोबत पृथ्वी शॉकडेही महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी असा असेल मुंबईचा संघ –
हे वाचलं का?
अजिंक्य रहाणे (कॅप्टन), पृथ्वी शॉ (व्हाईस-कॅप्टन), आदित्य तरे, शिवम दुबे, तुषार देशपांडे, सर्फराज खान, प्रशांत सोलंकी, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, धवल कुलकर्णी, हार्दिक तामोरे, मोहित अवस्थी, सिद्धेश लाड, साईराज पाटील, अमन खान, अरमान जाफर, यशस्वी जैस्वाल, तनुष कोटीयन, दीपक शेट्टी, रोस्टन डायस
इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर अजिंक्य रहाणे आयपीएलसाठी युएईत दाखल झाला. दिल्ली कॅपिटल्स संघाचा सदस्य असलेल्या अजिंक्य रहाणेला यंदाच्या हंगामात एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. त्यामुळे आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या निमीत्ताने अजिंक्य पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT