मराठमोळे क्रिकेटपटू-प्रशिक्षक वासु परांजपे यांचं निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक आणि खेळाडू वासु (वासुदेव) परांजपे यांचं आज निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यासारख्या महान क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवण्यात परांजपे यांचा मोलाचा वाटा होता. सुनील गावसकर यांना सनी हे नाव परांजपे यांनीच दिले. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समिती सदस्य जनीत परांजपे यांचे ते वडील होते.

ADVERTISEMENT

१९५६ ते १९७० या १४ वर्षांच्या कारकिर्दीत वासू परांजपे यांनी बडोदा आणि मुंबई या दोन संघांचं स्थानिक क्रिकेटमध्ये प्रतिनिधीत्व केलं. यानंतर परांजपे यांनी आपला मोर्चा क्रिकेट प्रशिक्षणाकडे वळवला. भारताच्या अनेक सिनीअर खेळाडूंनाही परांजपे यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या जाण्याने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.

कोणता खेळाडू पुढे जाऊन मोठं नाव कमावले हे ओळखण्याची खुबी परांजपे यांच्याकडे होती. राहुल द्रविडला विकेटकिपींग सोडून फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्लाही परांजपे यांनी दिला होता. त्यांनी काही काळासाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारीही सांभाळली होती. स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत असताना वासु परांजपे यांनी २९ सामन्यांमध्ये ७८५ रन्स केल्या ज्यात दोन शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. याव्यतिरीक्त गोलंदाजीत परांजपेंच्या नावावर ९ विकेट जमा आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT