गौतम गंभीरचं IPL मध्ये पुनरागमन, लखनऊ संघाच्या मार्गदर्शकपदी नियुक्ती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचं आयपीएलमध्ये पुनरागमन झालं आहे. आयपीएल २०२२ साठी नव्याने दाखल झालेल्या लखनऊ संघाच्या मार्गदर्शक पदावर गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

गौतम गंभीरने आयपीएलमध्ये याआधी कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्लीच्या संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. गौतमने आपल्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सला दोन विजेतेपद मिळवून दिली आहेत. १५४ सामन्यांमध्ये गौतम गंभीरच्या नावावर ४ हजार २१७ धावा जमा आहेत.

India Tour of South Africa : कसोटी मालिकेसाठी लोकेश राहुल भारताचा उप-कर्णधार

हे वाचलं का?

गौतम गंभीरने आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल लखनऊ संघाचे मालक संजीव गोएंका यांचे आभार मानले आहेत.

गौतम गंभीरची क्रिकेट कारकिर्द ही वाखणण्याजोगी आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाचं कामकाज करायला आम्ही उत्सुक आहोत. काही दिवसांपूर्वीच लखनऊ संघाने झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवरला मुख्य प्रशिक्षकपदावर नेमणूक केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT