World Cup 2023 : बाऊंड्री काउंट की सुपर ओव्हर; उपांत्य आणि अंतिम मॅच टाय झाला तर काय?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Boundary count or super over... know what will happen if the final-semi-final matches are tied?
Boundary count or super over... know what will happen if the final-semi-final matches are tied?
social share
google news

Super Over in World Cup 2023 : भारतात सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडिया पोहोचली आहे. उपांत्य फेरीत चार संघात दोन सामने खेळले जाणार आहेत. या विश्वचषकात आत्तापर्यंत एकही सामना टाय झालेला नाही आणि सुपर ओव्हरचा थरार बघायला मिळाला नाही. पण, उपांत्य किंवा अंतिम सामन्यात हे घडलं तर काय?

या एकदिवसीय विश्वचषकात काही अटीतटीच्या लढती झाल्या. पण, प्रेक्षकांना शेवटच्या षटकावर किंवा शेवटच्या चेंडूवर सामना जिंकण्याची किंवा सामना टाय करण्याच्या थरार अनुभवता आलेला नाही. पण, आता सामना टाय झाला आणि नंतर सुपर ओव्हर झाला, तर चाहत्यांना मागच्या वेळी घडलं तसं बाऊंड्री काऊंटसारखा वादग्रस्त नियमाचा अनुभव येऊ शकतो.

गेल्या विश्वचषकाची फायनल झाली होती खूपच रोमांचक

शेवटच्या म्हणजे 2019 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरी आणि फायनल खूपच रोमांचक ठरली होती. गेल्या विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. लंडनमधील लॉर्ड्सवर खेळलेला तो अंतिम सामना बरोबरीत सुटला होता. यानंतर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा एकदा घेतलं सावरून, नेमका किस्सा काय?

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिली सुपर ओव्हर होती. इथे आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे ही की विश्वचषक 2019 च्या फायनलनंतर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी 2 सामने टाय झाले होते, ज्यामध्ये सुपर ओव्हर्स घेण्यात आल्या होत्या. दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली होती. यानंतर चौकार मोजणीच्या नियमानुसार यजमान इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले होते. हा नियम त्यावेळी बराच वादग्रस्त ठरला होता. जो ऑक्टोबर 2019 मध्ये काढण्यात आला.

अंतिम फेरीत इंग्लंड बनला होता चॅम्पियन

यावेळी विश्वचषकाचा अंतिम सामना आणि नंतर सुपर ओव्हर टाय झाल्यास बाउंड्री मोजण्याचा नियम लागू होणार नाही. त्यामुळे चाहत्यांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, गेल्या विश्वचषकासारखेच समीकरण यावेळीही तयार झाले आणि अंतिम सामना आणि त्यानंतर सुपर ओव्हरही टाय झाली तर काय होईल? विजेता कसा घोषित केला जाईल? त्याबद्दल जाणून घ्या…

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> CM शिंदेंनी कीर्तिकरांना काय दिली होती ऑफर? रामदास कदमांनी सांगून टाकलं

चाहत्यांना बघायला मिळू शकतो दुहेरी थरार

विश्वचषकाचा कोणताही उपांत्य किंवा अंतिम सामना टाय झाला तर त्यात सुपर ओव्हर घेण्यात येईल. जर सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली तर अशावेळी पुन्हा सुपर ओव्हर घेण्यात येईल. सामन्याचा निकाला लागेपर्यंत सुपर ओव्हर्स खेळवल्या जातील. अशा प्रकारे यावेळी बाद फेरीत कोणताही सामना बरोबरीत सुटला तर चाहत्यांना दुप्पट थरार मिळेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT