Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे नवा महाराष्ट्र केसरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

(Shivraj Rakshe Maharashtra Kesari 2023)

ADVERTISEMENT

पुणे : प्रतिस्पर्धी महेंद्र गायकवाडला अवघ्या दोन मिनिटात चीतपट करुन राक्षेवाडीच्या शिवराज राक्षेनं महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे. गतवेळी खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेल्या शिवराजने यंदा मात्र महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न साकार केलं. शिवराजला आता महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा, रोख ५ लाखांचे बक्षीस आणि थार गाडी मिळणार आहे. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. 

हे वाचलं का?

पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत शनिवार (१४ जानेवारी) रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थिती ६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा रंगली. या स्पर्धेला अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह, महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार रामदास तडस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रिडामंत्री गिरीश महाजन अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

शनिवारी दुपारी माती विभाग अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखचा ६-४ असा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना गाठला. त्यानंतर गादी विभागातून शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरचा ८-१ असा मोठा पराभव करत अंतिम सामना गाठला. त्यामुळे शिवराज राक्षे विरुद्ध महेंद्र गायकवाड हे दोन्ही पैलवान मानाची गदा जिंकण्यासाठी मैदानात उतरले.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याची उत्कंठा लागून राहिलेली असतानाच अवघ्या दोन मिनिटात शिवराजने महेंद्रला आस्मान दाखवलं. शिवराज पहिल्या फेरीपासूनच आक्रमक होता. पहिल्या फेरीत दोन्ही तुल्यबळ पैलवानांनी एकमेकांना आजमावून पाहिले. त्यानंतर शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडवर चांगली पकड मिळवत त्याला दुसऱ्याच मिनिटातच चितपट केले. गतवेळी खंद्याच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागलेल्या शिवराजने यंदा मात्र मानाची गदा जिंकण्याचं स्वप्न साकार केलं.

ADVERTISEMENT

दरम्यान, स्पर्धा जिंकताच शिवराजचे प्रशिक्षक काका पवार आणि गोविंद पवार यांनी दोन्ही पैलवान माझ्याच तालमीतील असल्यानं आनंद झाल्याचं म्हणतं भावना व्यक्त केल्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT