खराब खेळासाठी माजी पाकिस्तानी कॅप्टनने पैशांची ऑफर दिली, दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचा गौप्यस्फोट
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सलीम मलिकविरुद्ध धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. पाकिस्तानी कर्णधाराने आपल्याला एका सामन्यात खराब खेळ करण्यासाठी हजारो डॉलर्सची ऑफर दिल्याचं वॉर्नने म्हटलं आहे. १९९४ साली कराची येथे झालेल्या कसोटी सामन्यात आपल्याला खराब खेळ करण्यासाठी सलीम मलिकने २ लाख अमेरिकन डॉलर्सची ऑफर दिल्याचं शेन वॉर्न म्हणाला आहे. Amazon […]
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सलीम मलिकविरुद्ध धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. पाकिस्तानी कर्णधाराने आपल्याला एका सामन्यात खराब खेळ करण्यासाठी हजारो डॉलर्सची ऑफर दिल्याचं वॉर्नने म्हटलं आहे.
१९९४ साली कराची येथे झालेल्या कसोटी सामन्यात आपल्याला खराब खेळ करण्यासाठी सलीम मलिकने २ लाख अमेरिकन डॉलर्सची ऑफर दिल्याचं शेन वॉर्न म्हणाला आहे. Amazon Prime वर आपल्या आगामी डॉक्युमेंट्री ‘Shane’ मध्ये वॉर्नने हा गौप्यस्फोट केला आहे.
या प्रसंगाबद्दल बोलताना शेन वॉर्न म्हणाला, “त्या सामन्यात आम्हाला पक्की खात्री होती की आम्ही जिंकणार आहोत. एक दिवस सलीम मलिक मला म्हणाला की मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी त्याच्या रुमवर गेलो, त्याने दरवाजा उघडला आणि मी आत जाऊन बसलो. त्यावेळी सलीम आणि माझ्यात सामन्यातबद्दल चर्चा सुरु झाली. तो म्हणाला की चांगला सामना सुरु आहे, ज्याला उत्तर देताना मी म्हणालो की हो, मला वाटतं उद्यापर्यंत आम्ही हा सामना जिंकू”.
यावर सलीमने केलेला खुलासा धक्कादायक होता. तो म्हणाला की आम्ही हा सामना हरु शकत नाही. जेव्हा आम्ही पाकिस्तानात सामना हरतो तेव्हा त्याचे काय परिणाम होतात याची तुला कल्पना नाहीये. आमची आमच्या परिवाराची घरं जाळली जातील. ज्यानंतर सलीम मलिकने मला आणि माझा सहकारी टीम मे ला जवळपास २ लाख अमेरिकन डॉलर्सची ऑफर देऊन काही वाईड बॉल टाकत विकेट घेण्याचा प्रयत्न करु नका असं सांगितलं.