Paris Olympic 2024 : विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार? CASने अपील स्विकारले
Vinesh Phogat News : CASने विनेशची मागणी स्विकारली आहे. त्यामुळे तिच्या अपीलावर सुनावणी होणार आहे. तसेच या सुनावणीसाठी विनेशला तिचा वकील नेमण्यास सांगितले आहे. या खटल्यासाठी भारत सरकारला वरिष्ठ वकील नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विनेश फोगटचे अपील CAS ने स्विकारले
विनेशला सुनावणीसाठी तिचा वकील नेमण्यास सांगितले
या प्रकरणावर उद्या दुपारी दीड वाजता सुनावणी
Vinesh Phogat News : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरलेली कुस्तीपट्टू विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केली आहे. या घोषणेपुर्वी विनेशने बुधवारी रात्री अपात्रतेविरुद्ध (Vinesh Phogat Dis Qualified) याचिका (अपील) दाखल करत संयुक्तपणे रौप्य पदक देण्यात यावे, अशी मागणी तिने क्रीडा लवाद न्यायालयाकडे केली होती. हे अपील CASने स्विकारले आहे. यावर आज रात्री साडेनऊ वाजता ही सुनावणी होणार होती, मात्र आता या प्रकरणावर उद्या दुपारी दीड वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता विनेश फोगटला (Vinesh Phogat) मेडल मिळणार की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (paris olympic 2024 vinesh phogat get medal or not hearing on friday in cas)
CASने विनेशची मागणी स्विकारली आहे. त्यामुळे तिच्या अपीलावर सुनावणी होणार आहे. तसेच या सुनावणीसाठी विनेशला तिचा वकील नेमण्यास सांगितले आहे. या खटल्यासाठी भारत सरकारला वरिष्ठ वकील नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे, जो विनेशचे प्रतिनिधित्व करेल आणि तिला संयुक्त रौप्य पदक देण्याची मागणी केली जाईल. ही सुनावणी भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरु होणार आहे.
हे ही वाचा : Ajit Pawar Exclusive: '...त्यावेळी चूक झाली तर पवार साहेब सावरून घ्यायचे', अजितदादांची बेधडक मुलाखत
CASची सुनावणी यापूर्वी गुरुवारीच होणार होती. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टने विनेशची बाजू मांडण्यासाठी 4 वकील दिले होते. जोएल मोनलुइस, एस्टेल इव्हानोव्हा, हॅबिन एस्टेल किम आणि चार्ल्स एम्सन अशी त्यांची नावे आहेत. पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी हे सर्व CAS चे वकील होते. पण भारतीय संघाने सुनावणीसाठी भारतीय वकील नेमण्यासाठी वेळ मागितला. त्यावर न्यायालयाने त्यांना वेळ देत सुनावणी दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारपर्यंत तहकूब केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
CAS नेमकं आहे काय?
कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट Court of Arbitration for Sport (CAS) ही जगभरातील खेळांसाठी तयार केलेली एक स्वतंत्र संस्था आहे. खेळाशी संबंधित सर्व कायदेशीर विवाद निकाली काढणे हे त्याचे काम आहे. 1984 मध्ये स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संस्था लवादाद्वारे खेळाशी संबंधित वाद सोडवण्याचे काम करते.त्याचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील लॉसने येथे आहे आणि त्याची न्यायालये न्यूयॉर्क शहर, सिडनी आणि लॉझने येथे आहेत. सध्याच्या ऑलिम्पिक यजमान शहरांमध्येही तात्पुरती न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. या क्रमाने, यावेळी पॅरिसमध्ये CAS ची स्थापना झाली.
हे ही वाचा : Raj Thackeray : 'मनसे'चा पाचवा उमेदवार ठरला, हिंगोलीतून 'या' नेत्याला तिकीट
प्रकरण काय?
विनेश फोगटला अपात्र ठरवल्याने भारताला मोठा धक्का बसला होता. 50 किलो फ्रीस्टाइल कुस्ती गटाच्या अंतिम सामन्याच्या काही तास आधी, विनेशचे वजन 100 ग्रॅमने जास्त असल्याचे आढळून आले होते. विनेशला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, पण वजन जास्त असल्याने अंतिम सामन्याच्या काही तास आधी तिला अपात्र ठरवण्यात आले. अशा परिस्थितीत नियमांमुळे उपांत्य फेरीत विजय मिळवूनही तिचे पदक हुकले. मात्र आता प्रकरण CAS कडे गेल्यानंतर विनेशच्या पदकाची आशा पुन्हा जागृत झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT