Raj Thackeray : 'मनसे'चा पाचवा उमेदवार ठरला, हिंगोलीतून 'या' नेत्याला तिकीट

मुंबई तक

ADVERTISEMENT

raj thackeray declare 5th candidate yfor hingoli assembl election Pramod bandu kutte mns raj thackeray maharashtra tour maharashtra politis
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनसेचा पाचवा उमेदवार ठरला

point

राज ठाकरेंनी हिंगोली मतदार संघातून उमेदवाराची घोषणा

point

राज ठाकरेंचे हिंगोलीकरांना आणि मनसैंनिकांना आवाहन

Raj Thackeray News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनेसे जोरदार तयारी सुरु केली आहे. त्याअनुषंगाने राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यानच ते आपला उमेदवार ठरवत आहेत. आता राज ठाकरे यांनी हिंगोली (Hingoli) मतदार संघातील उमेदवाराची घोषणा केली आहे. (raj thackeray declare 5th candidate yfor hingoli assembl election Pramod bandu kutte mns raj thackeray maharashtra tour maharashtra politis) 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोलापूर, धाराशिव, लातूर दौरा करुन ते आज हिंगोलीत पोहोचले आहेत. हिंगोलीत त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं, चक्क जेसीबीने फुलांची उधळण करत राज ठाकरेंचा हिंगोलीतील मनसैनिकांनी सन्मान केला.

हे ही वाचा : Indian Hockey Team, Paris Olympics: भारतीय हॉकी संघाने 52 वर्षांने रचला इतिहास, असं घडलं तरी काय?

यानंतर हिंगोली विधानसभा मतदार संघातून मनसेचे जिल्हाप्रमूख बंडू कूटे यांची राज ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज झालेल्या आढावा बैठकीनंतर राज ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी चक्क खांद्यावर हात ठेऊन, आता तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या,असे आवाहन हिंगोलीकरांना आणि मनसैंनिकांना केले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मनसे भाजप लढत होणार 

हिंगोली विधानसभा मतदारसंघात तानाजी मटुकूळे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. आता या मतदार संघातून मनसेने जिल्हाप्रमूख बंडू कूटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हिंगोलीत मनसे विरूद्द भाजप अशी लढत होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत किती अर्ज...सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यातून?

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यात आत्तापर्यंत मनसेचे 4 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये, दोन उमेदवार भाजपाविरुद्धच असल्याचं दिसून येतं. पंढरपूर आणि आता हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करणाऱ्या मनसेनं विधानसभेला महायुतीतून फारकत घेतल्याचं दिसून येत आहे. 

ADVERTISEMENT

चार उमेदवारांच्या नावाची घोषणा 

 आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून चार उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. राज ठाकरेंचे विश्वासू बाळा नांदगावकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिवडी विधानसभा मतदार संघातून मैदानात उतरणार आहेत. तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मैदानात उतरवण्यात येणार आहे. तर वरळीतून संदीप देशपांडे यांनाही तिकीट देण्यात येणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. मनसेने लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT