Prithvi Shaw selfie: पृथ्वी सापडला वादात.. हातात बेसबॉल बॅट, शेजारी मुलगी!
Prithvi Shaw controversy: मुंबई: भारतीय संघाचा (Team India) स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉबाबत (Prithvi Shaw) एक गंभीर बाब समोर येत आहे. एका महिला चाहत्याने पृथ्वी शॉ याने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून या संपूर्ण घटनेला सुरुवात झाली आहे. घटना उघडकीस आली आहे. दुसरीकडे पृथ्वी शॉच्या वतीने त्याच्या मित्राने या प्रकरणात […]
ADVERTISEMENT
Prithvi Shaw controversy: मुंबई: भारतीय संघाचा (Team India) स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉबाबत (Prithvi Shaw) एक गंभीर बाब समोर येत आहे. एका महिला चाहत्याने पृथ्वी शॉ याने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून या संपूर्ण घटनेला सुरुवात झाली आहे. घटना उघडकीस आली आहे. दुसरीकडे पृथ्वी शॉच्या वतीने त्याच्या मित्राने या प्रकरणात ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून त्यात त्याने आरोप केला आहे की, सना आणि शोबित ठाकूर यांच्यासह त्यांच्या काही मित्रांनी बेसबॉलच्या बॅटने त्यांच्या कारवर हल्ला केल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पृथ्वी शॉ हा हातात काठी घेऊन रस्त्यावर फिरताना आणि एका मुलीचा हात धरून तिच्याशी भांडताना दिसत आहे. (cricketer prithvi shaws car attacked after he refuses selfie police registered case against eight)
ADVERTISEMENT
पृथ्वी शॉचा मित्र आशिष सुरेंद्र यादव याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर बेसबॉलच्या बॅटने हल्ला करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी गाडीचा पाठलाग करून पैसे न दिल्याने खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप केला आहे. ज्यामध्ये आशिष यादव याने 8 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
रणजी ट्रॉफीत ‘पृथ्वी शॉ’ची बॅट तळपली! संजय मांजरेकरचा मोडला विक्रम
हे वाचलं का?
सपनाने केला पृथ्वी शॉवर मारहाणीचा आरोप
या 8 जणांपैकी सना उर्फ सपना गिल आणि शोबित ठाकूर नावाच्या दोघांना हॉटेलच्या व्यवस्थापकानेच ओळखले आणि पोलिसांना सांगितले. आता या प्रकरणात सपनाचे वकील अली काशिफ खान यांनी पृथ्वी शॉवर मारहाणीचा आरोप केला आहे.
ते म्हणाले की, ‘पृथ्वी शॉने सपनाला मारहाण केली. पृथ्वी शॉच्या हातातही काठी दिसत आहे. पृथ्वी शॉच्या मित्रांनी पहिले हल्ला केला होता. सपना सध्या ओशिवरा पोलीस ठाण्यात आहे. पोलिसांनी त्याला मेडिकलला जाण्याची परवानगी दिलेली नाही.’
क्रिकेटर पृथ्वी शॉची तरुणीला मारहाण @PrithviShaw @ICC @BCCI #PrithwiShow #BCCI pic.twitter.com/1TjXsWpbYp
— Mumbai Tak (@mumbaitak) February 16, 2023
ADVERTISEMENT
पृथ्वी शॉचा एक व्हिडिओ आणखी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या हातात एक काठी दिसत आहे. यादरम्यान सपना गिल पृथ्वी शॉच्या हातातील काठी धरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
हॉट मिस्ट्री गर्लने पृथ्वी शॉला शिकविल्या गरबा स्टेप्स : पहा फोटो
सेल्फी घेण्यावरून वाद
खरे तर हे संपूर्ण प्रकरण बुधवारचे आहे. जेव्हा पृथ्वी शॉ त्याच्या मित्रांसोबत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला पोहोचला. याच दरम्यान हा वाद झाला. पोलीस तक्रारीनुसार, अज्ञात आरोपी हा हॉटेलमध्ये पृथ्वी शॉ याच्याकडे आला आणि त्याने सेल्फी काढण्याची मागणी केली. शॉने दोन लोकांसोबत सेल्फीही काढले, पण तोच ग्रुप परत आला आणि त्यातील इतर जणही सेल्फी काढण्याचा आग्रह करू लागले.
पृथ्वी शॉने यावेळी आपण मित्रांसोबत जेवायला आलो असून मला त्रास देऊ नका असं म्हणत सेल्फीला नकार दिला. तक्रारीनुसार, त्याने अधिक आग्रह केला असता पृथ्वीच्या मित्राने हॉटेल व्यवस्थापकाला फोन करून तक्रार केली. व्यवस्थापकाने त्या लोकांना हॉटेलमधून बाहेर जाण्यास सांगितले. यानंतर ते सर्व बाहेर पृथ्वी शॉची वाट पाहू लागले.
हॉटेलमधून बाहेर पडताना कारवर हल्ला
पृथ्वी शॉच्या मित्राने केलेल्या तक्रारी असं म्हटलं आहे की, ‘आम्ही बाहेर पडताच आरोपी आणि त्याच्या मित्रांनी बेसबॉलच्या बॅटने पृथ्वी शॉच्या मित्राच्या कारची विंडशील्ड तोडली. त्यावेळी पृथ्वी शॉ कारमध्ये फक्त उपस्थित होता. पण आम्हाला कोणताही वाद नको होता म्हणूनच आम्ही पृथ्वी शॉला दुसऱ्या कारमध्ये बसवून पुढे पाठवले. जोगेश्वरीतील लोटस पेट्रोल पंपाजवळ शॉ यांच्या मित्राची गाडी थांबली होती. जिथे एक महिला आली आणि म्हणाली की हे प्रकरण पुढे न्यायचे नसेल तर 50 हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा खोटे आरोप करू.’ असं या तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ हा एका मुलीसोबत वाद घालताना दिसतो आहे. ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणात तो देखील अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT