‘त्या’ मुलीने क्रिकेटर पृथ्वी शॉ विरोधात कोर्टाकडे केली मोठी मागणी
सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर सपना गिलने भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे IPL चा हंगाम ऐन भरात असताना पृथ्वी शॉ अडचणीत येण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

cricketer prithvi shaw vs influencer Sapna Gill :
सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर सपना गिलने भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष सुरेंद्र यादव यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 354, 509, 324 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी सपना गिलने अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयापुढे केली आहे. (Criminal complaint filed against cricketer prithvi shaw and his friend ashish surendra yadav before andheri magistrate 66 court by influencer Sapna Gill)
यावेळी सपना गिलने हा हल्ला सिद्ध करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून सरकारी रुग्णालयाचा वैद्यकीय पुरावा जोडला आहे. यासोबत आपल्या तक्रारीची दखल न घेतल्याबद्दल विमानतळ पोलिस स्टेशनचे अधिकारी सतीश कवनकर आणि भागवत गरंडे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करावा अशी मागणी सपना गिलने केली आहे. यावर आता 17 एप्रिलला सुनावणी होणार आहे.
हेही वाचा : Dasun Shanaka : गुजरात संघात आला हा धडाकेबाज प्लेयर; ठरू शकतो गेमचेंजर
नेमकं काय घडलं होतं?
ओशिवरा पोलीस स्थानकात दाखल तक्रारीनुसार, 15 फेब्रुवारीला पृथ्वी शॉ आणि त्याचे मित्र एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. यावेळी हॉटेलमध्ये पृथ्वी शॉ याच्याकडे एक तरुण आला आणि त्याने सेल्फी काढण्याची मागणी केली. यावेळी पृथ्वीने 2 लोकांसोबत सेल्फीही काढला, पण तोच ग्रुप परत आला आणि त्यातील इतर जणही सेल्फी काढण्याचा आग्रह करू लागले.
