T20 World Cup : पाकिस्तानच्या धडाकेबाज कामगिरीचा भारतालाही फायदा, उपांत्य फेरीसाठी ‘असं’ आहे समीकरण

टी-२० वर्ल्डपमध्ये भारतीय संघाचा समावेश ब गटात करण्यात आला आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान यासारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमुळे हा गट ग्रूप ऑफ डेथ म्हणून ओळखला जात आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात भारत आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर मात करुन उपांत्य फेरीतलं आपलं स्थान जवळपास निश्चीत केलंय. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाची पुढची वाट खडतर झालेली असली तरीही पाकिस्तानने […]

Mumbai Tak
social share
google news

टी-२० वर्ल्डपमध्ये भारतीय संघाचा समावेश ब गटात करण्यात आला आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान यासारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमुळे हा गट ग्रूप ऑफ डेथ म्हणून ओळखला जात आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात भारत आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर मात करुन उपांत्य फेरीतलं आपलं स्थान जवळपास निश्चीत केलंय.

पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाची पुढची वाट खडतर झालेली असली तरीही पाकिस्तानने न्यूझीलंडवर मात करत भारतासमोरचं आव्हान आता काही प्रमाणात सोपं करुन ठेवलं आहे.

BLOG : याला कारण एकच…आम्हाला पराभव सहन होत नाही !

उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखायचं असेल तर भारताला ३१ तारखेला होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताला पुढील तीन सामन्यांमध्ये तुलनेने सोपं आव्हान असणार आहे. भारताने शेवटचे ३ सामना अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामीबिया या संघांविरुद्ध होणार आहेत.

पाकिस्तान संघाने भारत आणि न्यूझीलंड संघाला पराभूत करत ४ गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली आहे. जर पाकिस्तान संघाने स्कॉटलॅंड, अफगानिस्तान आणि नामिबिया संघाविरुद्ध विजय मिळवला तर, पाकिस्तान संघ १० गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करेल. तसेच भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करत इतर ३ संघांवर विजय मिळवला तर, भारतीय संघाचे ८ गुण होतील आणि उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता वाढेल. परंतु जर न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला तर, न्यूझीलंड संघाची उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची शक्यता वाढेल. तसेच भारतासमोरी आव्हान अधिक कठीण होईल.

पाकिस्तान संघ आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या गटाच्या गुणतालिकेत ४ गुणांसह सर्वोच्च स्थानी आहे. तर अफगानिस्तान संघ २ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच भारतीय संघाला अजूनपर्यंत खाते खोलता आले नाहीये. भारतीय संघ पाचव्या स्थानी आहे. जर भारतीय संघाला उपांत्यफेरीत प्रवेश करायचा असेल, तर पुढील सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp