Thailand Open : पी.व्ही. सिंधूची जबरदस्त कामगिरी, उपांत्य फेरीत धडक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

P. V. Sindhu News भारताची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू (P. V. Sindhu) ने थायलंड ओपन २०२२ (Thailand Open 2022) स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. जपानची बॅडमिंटनपटू अकाने यामागुचीला मात देत तिने सेमी फायनलची फेरी गाठली आहे.

ADVERTISEMENT

भारताला दोनवेळा ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या पी.व्ही. सिंधूने तिची चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. टोकिया ऑलिम्पिक्समध्ये सिंधूने कांस्य पदकावर नाव कोरलं होतं. त्यानंतरही तिने जोरदार कामगिरी करणं सुरूच ठेवली आहे. थायलँडच्या बँकॉकमध्ये सुरू असलेल्या थायलँड ओपनमध्ये तिने सेमी फायनल गाठली आहे.

थायलंड ओपनच्या उपांत्य पूर्व फेरीत अर्थात क्वॉर्टर फायनलमध्ये (Quarter Final) सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीला मात देत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. शुक्रवारी क्रमांक एकच्या कोर्टावर झालेल्या या सामन्यात तीन सेट्स झाले. ज्यातील दोन सेट्समध्ये विजय मिळवत सिंधूने सेमीफायनमध्ये धडक दिली आहे.

हे वाचलं का?

सर्वात आधी पहिल्या सेटमध्ये सिंधूने सुरुवातीपासून आपला दबदबा कायम ठेवत 21-15 च्या फरकाने सेट जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये जपानच्या अकाने हिने पुनरागमन करत 20-22 च्या फरकाने सेट जिंकला. पण अखेरच्या सेटमध्ये सिंधूने दमदार कामगिरी करत निर्णायत सेट 21-13 या चांगल्या फरकाने आपल्या नावे करत सामनाही नावे केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT