rinku singh : गॅस सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्याचा मुलगा रिंकू बनला IPLचा सुपरस्टार
रिंकू फार शिकलेला नव्हता, त्यामुळे त्याला कोचिंग सेंटरमध्ये सफाई कामगाराची नोकरी मिळाली. रिंकूला हे काम करावेसे वाटले नाही.
ADVERTISEMENT

Rinku singh life’s Story : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) 9 एप्रिलला (रविवार) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर असा सामना खेळला गेला, जो अनेक वर्षे चाहते विसरणार नाहीत. कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात रिंकू सिंगची मुख्य भूमिका होती. डावखुरा फलंदाज रिंकू सिंगने सामन्याच्या शेवटच्या षटकात असा अप्रतिम खेळ दाखवला की त्याचे कौतुक करायला शब्दच कमी पडले.(The story of Rinku, the 5-sixer; Who became the biggest superstar of IPL)
KKR : रिंकू सिंगचे उत्तुंग षटकार! नाचू लागला पठाण; सुहाना-अनन्यानेही लुटला आनंद
कोलकाताला शेवटच्या षटकात विजयासाठी 29 धावा करायच्या होत्या आणि त्यांचा पराभव जवळपास निश्चित दिसत होता. गुजरात टायटन्सचा कार्यवाहक कर्णधार राशिद खानने डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालकडे शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी सोपवली. यश दयालच्या पहिल्याच चेंडूवर उमेश यादवने सिंगल घेत रिंकू सिंगला स्ट्राईक दिली. यानंतर रिंकूने सलग पाच षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
शेवटच्या सात चेंडूत 40 धावा केल्या
आपल्या संघाचा कर्णधार नितीश राणा बाद झाल्यानंतर रिंकू सिंग क्रीजवर आला. 25 वर्षीय रिंकूने आपल्या डावाची सुरुवात अतिशय संथ गतीने केली आणि पहिल्या 14 चेंडूत केवळ 8 धावा केल्या. पण, रिंकूने खेळलेल्या शेवटच्या सात चेंडूंमध्ये त्याने 40 धावा केल्या. एकंदरीत, रिंकू सिंगने 21 चेंडूंचा सामना करत नाबाद 48 धावा केल्या, ज्यात सहा षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता.
रिंकूच्या आयपीएल कारकिर्दीतील ही सर्वोत्तम धावसंख्या होती.आयपीएलच्या इतिहासात एखाद्या संघाने शेवटच्या षटकात इतक्या धावा देऊन सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी आयपीएल 2016 मध्ये, रायझिंग पुणे सुपरजायंट्सने पंजाब किंग्जविरुद्ध शेवटच्या षटकात आवश्यक 23 धावा केल्या होत्या. या धमाकेदार खेळीनंतर रिंकू सिंग आयपीएलच्या सुपरस्टार खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. रिंकू सिंगची कहाणी लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
