अजिंक्य राहणेने झापलं अन यशस्वीचं करिअरच बदललं; काय घडलं होतं मैदानात?
अजिंक्य रहाणेने त्याच्याच संघातील खेळाडू यशस्वी जयस्वालला त्याच्या एका चुकीमुळं मैदानाबाहेर पाठवले मात्र त्याचा त्याच्यावर वाईट परिणाम झाला नाही तर त्याच्या यशात रहाणेचा तो निर्णय त्याच्यावर पत्तावर पडल्याचं तो सांगतो.
ADVERTISEMENT

Ajinkya Rahane Change Yashasvi Jaiswal Career: कोईम्बतूरमधील दुलीप ट्रॉफीच्या (Duleep Trophy) फायनलची एक आठवण सांगितले जाते. हा सामना 21 सप्टेंबर रोजी सुरु झालेला आणि 25 सप्टेंबर रोजी संपला. हा सामना वेस्ट झोन आणि साऊथ झोनमध्ये झाला होता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली वेस्ट झोनने हा सामना 294 धावांनी जिंकला होता. या सामन्यात यशस्वी जैस्वालही (Yashasvi Jaiswal) खेळत होती, पहिल्या डावात केवळ 1 धावा करणाऱ्या जयस्वालने दुसऱ्या डावात मात्र 265 धावा केल्या. त्याच्या त्याच खेळीमुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ देण्यात आला होता.
चमकदार कामगिरी
पण हा सामना क्रिकेटच्या इतिहासात अगदी सुवर्णक्षरांनी लिहिण्यासारखा झाला. कारण त्याच्या चमकदार कामगिरी आणि यशस्वीच्या वागण्यामुळे. अंतिम सामन्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गोंधळ झाला होता, मात्र तो गोंधळ नेमका काय झाला होता तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
यशस्वी मैदानाबाहेर
वास्तविक वेस्ट झोनचा कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या संघातील खेळाडू यशस्वी जयस्वालला मैदानाबाहेर पाठवले होते, कारण होतं यशस्वी जैस्वालच्या त्याच्या त्या एका चुकीमुळे, रहाणेला तसं पाऊल उचलावं लागलं होते. यशस्वी वारंवार दक्षिण विभागाच्या फलंदाजांची, विशेषतः रवी तेजाची स्लेजिंग करत होता.
मैदानात फक्त 10 खेळाडू
त्या प्रकरणाबाबत पंचांनी यशस्वीला दोन-तीन वेळा ताकीदही दिली होती. डावाच्या 57 व्या षटकात यशस्वीने पुन्हा तेच केले तेव्हा पंचांनी कर्णधार रहाणेशी संवाद साधला होता. आणि त्यानंतर यशस्वीला मैदानंही सोडावं लागलं होतं. विशेष बाब म्हणजे पंचांनी पश्चिम विभागाला पर्यायी क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी दिली नाही, त्यामुळे त्यांना काही षटकांसाठी 10 खेळाडूंसह मैदानातच थांबावं लागले.










