कोण आहे प्रविण तांबे?; ज्याचं आयुष्य चित्रपटामुळे चर्चेत आलंय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वयाच्या चाळीशीत पोहोचलेल्या धोनी आयपीएल वगळता सर्व प्रकारच्या किक्रेटमधून निवृत्ती घेतलीये. क्रिकेटमध्ये चाळीशी ओलांडल्यानंतर बहुतांश क्रिकेटपटूचा कल निवृत्ती घेऊन कमेंट्री किंवा प्रशिक्षक म्हणून करण्याकडे झुकत जातो. मात्र, सध्या ज्या खेळाडूच्या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. त्या प्रविण तांबेने वयाच्या ४१ व्या वर्षी पदार्पण केलं होतं. त्यांचा हाच संघर्ष आता पडद्यावर झळकला आहे. चला तर जाणून घेऊया प्रविण तांबेंचं आयुष्य आतापर्यंत आयुष्य कसं होतं?

ADVERTISEMENT

प्रविण तांबेचा जन्म ८ ऑक्टोबर १९७१ रोजी झाला होता. वडिलांचं नाव विजय तांबे, तर आईचं नाव ज्योती तांबे आहे. त्याचे वडील जॉन्सन अॅण्ड जॉन्सन नावाच्या टीमकडून क्रिकेट खेळायचे. प्रविण आपल्या वडिलांसोबत जायचा. तेव्हापासून त्याला क्रिकेटचं वेड लागलं.

तांबे १९९४ ते २००४ पर्यंत ओरिएंट शिपिंग टीमकडून क्रिकेट खेळायचा. जलदगती गोलंदाज असलेल्या प्रविणला लेग स्पिनर म्हणून गोलंदाजी करण्याचा सल्ला मिळाला. त्याने फिरकी गोलंदाजी सुरू केली आणि तो यशस्वीही ठरला. दुर्दैवाने २००४ मध्ये शिंपिंग कंपनी कारभार गुंडळला आणि प्रविणचं क्रिकेट काही काळासाठी थांबलं.

हे वाचलं का?

त्यानंतर प्रविण डी.वाय पाटील स्पोर्टस अकादमी खेळायला लागला. मुंबई क्रिकेट क्लबमध्ये जाण्यासाठी प्रविणने कष्ट केले, पण यश काही मिळालं नाही. त्यानंतर वयाच्या ४१व्या वर्षी प्रविणला पहिली संधी मिळाली आयपीएलमध्ये २०१३ मध्ये.

आयपीएलमध्ये प्रविणला राजस्थान रॉयल्सकडून खेळायची संधी मिळाली. त्याचबरोबर २०१३ मध्येच त्याने मुंबईकडून रणजी, तर २०१७ मध्ये विजय हजारे ट्रॉफी पदार्पण केलं होतं. प्रविण कॅरेबियन प्रीमियर लीग आणि अबुधाबी टी१० लीगमध्येही खेळला आहे. प्रविण तांबे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सबरोबरच सनरायझर्स हैदराबादकडूनही खेळला आहे.

ADVERTISEMENT

प्रविण तांबेची चर्चेतील कामगिरी

ADVERTISEMENT

प्रविण २०१३ मध्ये चॅम्पियन्स लीग टी२० मध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा खेळाडू ठरला होता. प्रविणने पाच सामन्यांमध्ये १२ बळी घेतले होते.

प्रविणनने २०१४ मध्ये झालेल्या आयपीएलच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या सामन्या हॅटट्रिक केली होती.

टी१० लीगमध्ये हॅटट्रिक घेणारा प्रविण तांबे पहिला खेळाडू आहे. त्याचबरोबर एकाच सामन्यात ५ खेळाडू बाद करणाराही पहिलाच खेळाडू आहे.

फेब्रुवारी २०२० मध्ये प्रविण तांबेला २०१८ मध्ये झालेल्या टी१० लीगमध्ये सहभागी झाल्याच्या कारणावरून २०२० मधील आयपीएलमध्ये खेळण्यास अयोग्य घोषित करण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT