12 वर्षांखालील मुलांची कमाल, पटकावलं डॉ. साळगावकर स्पर्धेचे विजेतेपद - Mumbai Tak - under 12 team of bhagwan bhoir school kalyan won big in dr salgaonkar cricket tournament - MumbaiTAK
स्पोर्ट्स

12 वर्षांखालील मुलांची कमाल, पटकावलं डॉ. साळगावकर स्पर्धेचे विजेतेपद

भगवान भोईर हायस्कूल संघाने मोहन क्रिकेट क्लब संघावर 17 धावांनी मात करत 12 वर्षांखालील मुलांच्या डॉ. साळगावकर क्रिकेट स्पर्धेचे विजेतपद पटकावले.
under 12 team of bhagwan bhoir school kalyan won big in dr salgaonkar cricket tournament

कल्याण: कल्याणमधील आयोजित डॉ. साळगावकर क्रिकेट स्पर्धेत १२ वर्षांखालील (Under 12) मुलांच्या भगवान भोईर हायस्कूल संघाने मोहन क्रिकेट क्लब संघावर 17 धावांनी मात करत विजेतेपद पटकावलं आहे. केएफसीए क्रिकेट अॅकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक प्रज्योत सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीबीएचएस संघाने या स्पर्धेत प्रथमच सहभाग घेतला होता. पहिल्याच प्रयत्नात या संघाने विजेतेपद पटकावले. (under 12 team of bhagwan bhoir school kalyan won big in dr salgaonkar cricket tournament)

स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या वेळी युनियन क्रिकेट अॅकॅडमीचे प्रमुख तुषार सामानी आणि भगवान भोईर शाळेचे मार्गदर्शक प्रशांत भोईर उपस्थित होते. ही स्पर्धा नुकतीच पश्चिमेतील वायलेनगर येथील युनियन क्रिकेट ग्राऊंडवर पार पडली. स्पर्धेत ठाणे, मुंबईसह अन्य शहरांतील 16 संघांची सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बीबीएचएस संघाने निर्धारित 20 षटकात 4 बाद 149 धावांचे लक्ष्य उभारले. सत्यनारायण घुगेने 74 धावा तसेच सन्मित कोथमिरेने 34 धावा करत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. या धावसंख्येचा पाठलाग करताना मोहन सीसी संघाचा डाव 131 धावांवर आटोपला.

हे ही वाचा >> IPL 2023, CSK vs GT Final: गुजरातला कशी चारली धूळ, चेन्नईच्या विजयाची 5 कारणे

ही स्पर्धा शनिवारी पश्चिमेतील वायले नगर येथील युनियन क्रिकेट ग्राउंडवर पार पडली. या स्पर्धेत ठाणे, मुंबईसह अन्य शहरातील 16 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बीबीएचएस संघाने निर्धारित 20 षटकात 4 बाद 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

मोहन सीसी संघातील वीर सचदेवने केलेल्या 30 धावा व अथर्व शिंदेच्या 34 धावा वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी साफ निराशा केली. अथर्वची झुंज ही एकाकी ठरली. अमर बिसू कर्माने 29 धावा देत ३ बळी व जितेश कुलकर्णीने १३ धावा देत २ बळी मिळविले. पाच सामन्यात १६८ धावा करणारा बीबीएचएस संघाचा सत्यनारायण घुगे सर्वोत्कृष्ट फलंदाज, तर पाच सामन्यांत दहा बळी घेणारा आर्यन पाटील हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून सन्मित कोथमिरे, तर अमर ब कर्माची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

हे ही वाचा >> 2024 लोकसभा निवडणूक: BJP-शिंदेंसाठी धोक्याची घंटा, मविआ मारणार मोठी मुसंडी?

बीबीएचएस संघाचा बोलबाला

बीबीएचएस संघाचा सत्यनारायण घुगे सर्वोत्कृष्ट फलंदाज तर पाच सामन्यात दहा बळी घेणारा आर्यन पाटील हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. त्याचबरोबर, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण सन्मित कोथमिरे व अमर बिसू कर्मा यांची स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती केएफसीए क्रिकेट अकॅडेमीचे मुख्य प्रशिक्षक प्रज्योत सकपाळ यांनी दिली.

झोप येत नसेल तर हे करुन बघा, 60 सेकंदात झोप येईल लग्न नकोच! ‘या’ मराठी अभिनेत्री घटस्फोटानंतर सिंगल लाइफ करतायेत एन्जॉय Amitabh love story : पुण्यात बघितलं अन् पहिल्या नजरेतच खेळ खल्लास! ODI 2023: न्यूझीलंडला मोठा झटका, ओपनिंग सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर! iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा… Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला ‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी…