Vijay Hajare Trophy : मुंबईचा सलग पाचवा विजय, हिमाचलचा धुव्वा - Mumbai Tak - vijay hajare trophy mumbai beat himachal pradesh by 200 runs 5 wins in a row - MumbaiTAK
स्पोर्ट्स

Vijay Hajare Trophy : मुंबईचा सलग पाचवा विजय, हिमाचलचा धुव्वा

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई संघाने विजय हजारे ट्रॉफीत आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. जयपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईने हिमाचल प्रदेशचा २०० रन्सनी धुव्वा उडवला. सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, शार्दुल ठाकूर यांच्या धडाकेबाज हाफ सेंच्युरीच्या जोरावर मुंबईने ३२१ रन्सचा टप्पा गाठला. 5⃣ matches 5⃣ wins Mumbai continue their winning run as they beat Himachal […]

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई संघाने विजय हजारे ट्रॉफीत आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. जयपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईने हिमाचल प्रदेशचा २०० रन्सनी धुव्वा उडवला. सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, शार्दुल ठाकूर यांच्या धडाकेबाज हाफ सेंच्युरीच्या जोरावर मुंबईने ३२१ रन्सचा टप्पा गाठला.

टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतलेल्या मुंबईची खराब सुरुवात झाली. यशस्वी जैस्वाल, पृथ्वी शॉ आणि कॅप्टन श्रेयस अय्यर स्वस्तात माघारी परतले. यानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात सर्फराज खानही आऊट झाला. ४ बाद ४९ अशा खडतर परिस्थितीत अडकलेल्या मुंबईला सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे यांनी सावरलं. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी ९९ रन्सची पार्टनरशीप केली. ९१ रन्सवर सूर्यकुमार यादवला आऊट करत हिमाचलच्या डागरने मुंबईला धक्का दिला.

यानंतर मैदानावर आलेल्या शार्दुल ठाकूरने हिमाचलच्या अडचणींमध्ये आणखी भर टाकली. आदित्य तरेच्या साथीने पुन्हा फटकेबाजी सुरुवात करत शार्दुलने हिमाचलच्या बॉलर्सना सळो की पळो करुन सोडलं. आदित्य तरे ८३ रन्स काढून आऊट झाल्यानंतरही शार्दुलने फटकेबाजी सुरु ठेवली. ५७ बॉलमध्ये ६ फोर आणि सिक्स लगावत शार्दुलने ९२ रन्स केल्या.

प्रत्युत्तरादाखल हिमाचल प्रदेशच्या संघाची सुरुवातच चांगली झाली नाही. प्रशांत सोळंकी, धवल कुलकर्णी, शम्स मुलानी यांच्या माऱ्यासमोर हिमाचलचा संघ गडगडला. एकामागोमाग एक बॅट्सन आऊट होत गेल्याने मुंबईचा विजय सोपा होऊन गेला. हिमाचल प्रदेशकडून एकांत सेन, प्रवीण ठाकूर, कॅप्टन रिशी धवन आणि मयांक डागर यांनी झुंज दिली पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × four =

Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat! दिया मिर्झा ‘या’ एका गोष्टीने करते दिवसाची सुरूवात, जाणून घ्या Fitness रूटीन! Weight Gain करायचंय? फक्त ‘ही’ एक गोष्ट खा, सप्लीमेंटची पडणार नाही गरज! ‘सुशांत सिंह राजपूत ओव्हर सेंसिटिव्ह…’, मुकेश छाबरांनी असं काय सांगितलं? ‘दुआओ मे याद रखना’, स्टार कोरिओग्राफर अडकला लग्नबंधनात! PHOTOS Kiara Advani च्या हॉट-टोन्ड फिगरचं खास सीक्रेट, कशी राहते एवढी Fit? Shehnaaz ने शेतात केली मस्ती; Viral फोटो पाहून चाहतेही झाले खुश! Wine पाण्यासोबत का घेत नाहीत? Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! ‘हे’ दुष्परिणाम माहिती आहेत का? तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग