व्हीडिओ
Kashmiri Pandits : हिंदूंवरील हल्ल्यावरून ठाकरे Vs मोदी, महिन्याभरात 8 काश्मिरींची हत्या
गेल्या महिन्याभरात 8 जणांची झाली हत्या
90च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या नरसंहारावर आलेल्या द काश्मिर फाईल्स सिनेमाचे भाजप गोडवे गात होती, आता त्याच काश्मिरी पंडितांवर पुन्हा काश्मीर सोडण्याची वेळ आल्यावर विरोधक भाजपवर तुटून पडलेत. हिंदुत्वावरून भाजप शिवसेनेला टार्गेट करत असतानाच आता याच काश्मिरी पंडितांचा धागा पकडत शिवसेनेनंही भाजपला प्रश्न विचारलेत.
संजय राऊत तर दररोज काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या हल्ल्यांवरून हा काश्मिर फाईल्स 2 आहे, असंही बोलत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही मदतीचं आश्वासन काश्मिरींना दिलंय.