Budh Uday 2026 : यंदाचे वर्ष हे ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, 2026 मध्ये बुध ग्रह कुंभ राशीत भ्रमण करताना त्याचा दोनदा अस्त आणि उदय होणार आहे. 10 फेब्रुवारी 2026 रोजी बुध ग्रहाचा उदय झाल्यानंतर 28 फेब्रुवारीला त्याचा अस्त होईल आणि पुन्हा 13 मार्च 2026 रोजी पुन्हा त्याचा उदय होईल. ग्रहांची ही बदलती स्थिती काही राशींसाठी भाग्योदयाची ठरणार आहे.
ADVERTISEMENT
फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत बुधाच्या या अवस्थांमुळे विशेष योग जुळून येत आहेत. सामान्यतः एखाद्या ग्रहाचा अस्त होतो तेव्हा त्याची शक्ती कमी होते, असे मानले जाते. मात्र, या काळात मिथुन, कन्या, तूळ आणि धनु या चार राशींना सकारात्मक फळ मिळण्याचे संकेत आहेत. बुध हा बुद्धी, संवाद आणि व्यापाराचा कारक असल्याने या क्षेत्रांशी संबंधित लोकांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : वीट भट्टीवर काम करणाऱ्या विधवा महिलेवर 12 तास बलात्कार, मालकाचे कृत्य; पोलिस कारवाई करायला घाबरले
'या' राशीच्या लोकांना होणार विशेष लाभ
मिथुन : बुध तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव तुमच्यावर सर्वाधिक दिसून येईल. या काळात तुमचे आत्मबळ मजबूत राहील. तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. रेंगाळलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमची संवादशैली तुम्हाला मोठा लाभ मिळवून देऊ शकते. सासरच्या मंडळींकडून धनलाभाचे संकेत आहेत.
कन्या : कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक स्थिती संतुलित करणारा असेल. उत्पन्न वाढीच्या संधी मिळू शकतात. जर गुंतवणुकीचा विचार असेल, तर 13 मार्चनंतर पाऊल उचलणे शुभ ठरेल. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. जुन्या कर्जातून सुटका मिळू शकते. व्यापाराशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : पत्नीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध! तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन कालव्यात फेकले
तूळ : तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रेम जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरु शकतो. सर्जनशील कार्यांमध्ये रुची वाढेल. नवीन योजनांमध्ये यश मिळू शकते. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
धनु : धनु राशीसाठी हा काळ हिंमत आणि आत्मविश्वास वाढवणारा असेल. भावंडांची साथ मिळेल आणि छोट्या सहली लाभदायक ठरतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याने प्रगतीच्या संधी मिळू शकतात.
ADVERTISEMENT











