बहिणीला गवताचा भारा उचलायला बोलावले अन् चुलत भावाने केलं कांड, प्रायव्हेट पार्टला इजा अन्..

मुंबई तक

• 12:16 PM • 03 Apr 2026

एका अल्पवयीन मुलाने त्याच्या चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत बहिण शेतात गेली असता तिला एकटे गाठून त्याने अत्याचार केले. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बहिणीला गवताचा भारा उचलायला बोलावले अन् चुलत भावाने केलं कांड

point

प्रायव्हेट पार्टला इजा अन्..

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर  तिच्या चुलत भावाने शेतात नेऊन अत्याचार केला. या घटनेत मुलीच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला असून, तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हे वाचलं का?

शेतात केले अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (1 एप्रिल) संध्याकाळी ही बालिका गावातील इतर मुलींसोबत शेतात शेळ्या चारण्यासाठी गेली होती. यावेळी शेजारीच राहणाऱ्या चुलत भावाने तिला गवत ठेवण्याच्या बहाण्याने आपल्याजवळ बोलावले. त्यानंतर तिला फूस लावून एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर अत्याचार करून तो तेथून पसार झाला. मुलीच्या प्रायव्हेट पार्टला इजा झाल्याने तिची प्रकृती बिघडली. यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ तिला रुग्णालयात नेले, जिथे तिच्यावर रात्रभर उपचार सुरू होते. उत्तर प्रदेशातील एटवाह परिसरातील ही घटना आहे.

हे ही वाचा : गर्लफ्रेंड मामाच्या मुलासोबत फिरत होती, सगळं पाहून बॉयफ्रेंडच्या डोक्यात तिडीक गेली, अन् पुढे भयंकर घडलं!

पोलिसांनी केली टाळाटाळ

पीडितेच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. घटनेची माहिती देऊनही पोलिसांनी रात्री कोणतीही कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर गुरुवारी (2 एप्रिल) सकाळी पीडितेच्या आईने '1090' या महिला हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवली. हेल्पलाईनवर तक्रार झाल्यानंतर पोलीस यंत्रणा हलली आणि त्यानंतरच गुन्हा दाखल करून मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी रात्री टाळाटाळ केल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

हे ही वाचा : मुंबईची खबर : रिक्षाने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना फटका, 8 एप्रिल रोजी रिक्षाचालकांचा संप; नेमकं कारण काय?

आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया

याप्रकरणी स्पष्टीकरण देताना पोलीस ठाण्याचे प्रभारी महेंद्र सिंह यांनी सांगितले की, गुन्हा दाखल होताच आरोपी किशोरवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई न केल्याचे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. सध्या पीडित मुलीवर उपचार सुरू असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.