Vastu Tips In Marathi : किचनसंबंधीत वास्तू नियमांचं पालन करणं आवश्यक मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने त्या व्यक्तीवर माता अन्नपूर्णा देवी आणि माता लक्ष्मीची कृपा होत नाही. वास्तू शास्त्रानुसार, किचनमध्ये काही अशा गोष्टी असतात, ज्या रिकाम्या होण्याआधीच भरल्या पाहिजेत. जर किचनमध्ये या गोष्टी संपल्या किंवा त्यांचे डब्बे रिकामे झाले, तर माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. यामुळे तुमच्यावर मोठं आर्थिक संकट ओढावू शकतं.
ADVERTISEMENT
गव्हाचं पीठ
किचनमध्ये नेहमीच गव्हाचं पीठ भरून ठेवलं पाहिजे. वास्तूशास्त्रानुसार, गव्हाचं पीठ संपणं अशुभ मानलं जातं. यामुळे त्या व्यक्तीचा मान सन्मान कमी होऊ शकतो. गव्हाचं पीठ संपण्याच्या मार्गावर असल्याल रिकामा डब्बा ठेऊ नये. गव्हाच्या पीठात वाढ केली पाहिजे. किचनमध्ये नेहमीच अधिक प्रमाणात गव्हाचं पीठ असलं पाहिजे.
हळदी
हळदीला हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानलं जातं. हे पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यात उपयुक्त ठरू शकतं. घरात हळदी संपणं म्हणजे गुरु दोष निर्माण होऊ शकतं. यामुळे शुभ कार्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. किचनमध्ये हळदीचा डब्बा कधीही रिकामा ठेऊ नये.
हे ही वाचा >> CBSE Result 2025: उद्या दहावी-बारावीचा निकाल लागणार? बोर्डाकडून मोठी अपडेट आली समोर!
मीठ
किचनमध्ये ठेवलेलं मीठ कधीही पूर्णपणे संपलेलं नसावं. मीठाचा डब्बा रिकामा झाल्याने त्याला लगेच भरला पाहिजे. मीठ संपल्याने घरात नकारात्मक उर्जेचा प्रेवश होऊ शकतो आणि वास्तू दोष निर्माण होऊ शकतात.
तांदूळ
तांदूळ पूजा-विधीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. किचनमध्ये भात मोठ्या प्रमाणात तांदूळ उपलब्ध असतं. तांदळाचा डब्बा कधीही रिकामा राहणार नाही, याची काळजी घ्या.तांदूळ संपल्याने शुक्र दोष लागू शकतं आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.
लवंग
किचनमध्ये लवंग नेहमीच उपलब्ध असलं पाहिजे. लवंगाचा डब्बा कधीही रिकामा ठेऊ नका. लवंगाचा डब्बा रिकामा असल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होत नाही.लवंगमुळे घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक उर्जा निर्माण होते.
हे ही वाचा >> ब्युटी पार्लरला गेलेल्या नवरीसोबत घडला मोठा कांड! वडिलांना आला हार्ट अटॅक, लग्नमंडपात नवऱ्यानेही...
ADVERTISEMENT
