सूर्य, शनी अन् शुक्राची युती, 'या' राशींच्या लोकांचे नशीब पालटणार, त्रिग्रही राजयोगामुळे हात लावाल तिथं सोनं होणार

Trigrahi Rajyoga 2026 : मार्च महिन्याची सुरुवात लवकरच होणार असून या महिन्यात अनेक मोठे शुभ योग जुळून येत आहेत. यापैकी एक म्हणजे 'त्रिग्रही राजयोग'. 15 मार्च रोजी मीन राशीमध्ये सूर्य, शनी आणि शुक्र यांच्या युतीमुळे हा त्रिग्रही राजयोग निर्माण होईल. ज्योतिषांच्या मते, त्रिग्रही योग बनल्यामुळे जातकांना करिअरमध्ये उंची, सुख-समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. तसेच, भाग्याचीही साथ लाभते. चला तर मग जाणून घेऊया त्या राशींबद्दल ज्यांना त्रिग्रही योग बनल्यामुळे यश मिळणार आहे.

Trigrahi Rajyoga 2026

Trigrahi Rajyoga 2026

मुंबई तक

• 09:01 AM • 27 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

सूर्य, शनी अन् शुक्राची युती,

point

'या' राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

point

त्रिग्रही राजयोगामुळे हात लावाल तिथं सोनं होणार

Trigrahi Rajyoga 2026 : मार्च महिन्याची सुरुवात लवकरच होणार असून या महिन्यात अनेक मोठे शुभ योग जुळून येत आहेत. यापैकी एक म्हणजे 'त्रिग्रही राजयोग'. 15 मार्च रोजी मीन राशीमध्ये सूर्य, शनी आणि शुक्र यांच्या युतीमुळे हा त्रिग्रही राजयोग निर्माण होईल.  2 मार्च रोजी शुक्र आपल्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करेल, जिथे शनी आधीच विराजमान आहे आणि 15 मार्चला सूर्य देव देखील मीन राशीत प्रवेश करतील.

हे वाचलं का?

ज्योतिषांच्या मते, त्रिग्रही योग बनल्यामुळे जातकांना करिअरमध्ये उंची, सुख-समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. तसेच, भाग्याचीही साथ लाभते. चला तर मग जाणून घेऊया त्या राशींबद्दल ज्यांना त्रिग्रही योग बनल्यामुळे यश मिळणार आहे.

हे ही वाचा : 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? कधीपासून झाली सुरूवात? जाणूया इतिहास आणि महत्त्व

'या' राशींना होणार त्रिग्रही राजयोगाचा लाभ

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत असून करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. काही लोकांना आवडीची नोकरीही मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोक आपल्या योजनांमध्ये यश मिळवू शकतात. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल आणि घरातील वातावरणही सुखद राहील.

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांना या काळात करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. कार्यक्षेत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. ऑफिसमध्ये तुमची प्रतिमा सुधारेल. कुटुंबातही सकारात्मक बदल पाहायला मिळतील.

हे ही वाचा : Maharashtra Weather : पुढील 24 महत्त्वाचे, IMD चा महत्त्वाचा अलर्ट

कुंभ : या काळात निर्माण होणारा योग कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कामकाजात ज्या अडचणी येत होत्या, त्यात हळूहळू सुधारणा पाहायला मिळू शकते. नशिबाची साथ मिळेल, ज्यामुळे तुमची अनेक कामे सहज पूर्ण होतील. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहू शकते आणि समाजात तुमची प्रतिमा मजबूत होईल.

 

    follow whatsapp