मनोज जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब, श्रीकांत शिंदेंना 500 कोटी पोहोचल्याची क्लीप ऐकवली!

मुंबई तक

22 Oct 2026 (अपडेटेड: 22 Oct 2026, 01:07 PM)

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी एक ऑडिओ क्लिप उघड केली आहे.

Manoj Jarange Audio Clip

Manoj Jarange Audio Clip

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

खळबळजनक ऑडिओ क्लिप

point

मनोज जरांगेंचा मोठा दावा

point

क्लिपमध्ये काय

Manoj Jarange Audio Clip : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी एक ऑडिओ क्लिप उघड केली आहे, ज्यामध्ये त्यांच्याविरोधात मोठे राजकीय षड्यंत्र रचले जात असल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. मराठा समाजाने प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवावे आणि आपल्याविरोधात कसे डाव रचले जात आहेत याची दखल थेट देशाच्या पंतप्रधानांनी घ्यावी, अशी आक्रमक मागणी जरांगे यांनी केली आहे. ही ऑडिओ क्लिप विधानसभा निवडणुकीदरम्यानची असून ती भाजपच्या कॉन्फरन्स मीटिंगची असल्याचा दावा करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

ऑडिओ क्लिपमध्ये काय?

या ऑडिओ क्लिपनुसार, मराठवाड्यात जरांगे यांच्याविरोधात बोलण्यासाठी लोक तयार केले जात असून त्यांना रोखले नाही तर ते मराठवाड्यात सर्वांना गिळंकृत करतील आणि त्यांना डॅमेज करण्याचे प्रयत्न त्वरित सुरू करावेत, अशा प्रकारची चर्चा असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. या क्लिपमध्येच पुढे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मनोज जरांगे यांना 500 कोटी रुपये पोहोचल्याचा खळबळजनक दावा भाजपच्या आयटी सेलच्या एका महिला सदस्याने या मिटिंगमध्ये केला आहे. तसेच जरांगे विधानसभा निवडणुकीत फायद्याचे ठरणार की नाही, यावर वेगवेगळे राजकीय गणित मांडले गेल्याचे समोर आले आहे. 

हे ही वाचा : Uddhav Thackeray Dasara Melava | बाळासाहेब ठाकरेंची भेट आणि गाडीची गोष्ट

'कुणीही बोलायला तयार नाही'

या ऑडिओ क्लिप्समध्ये भाजपचे नेते निरंजन डावखरे आणि प्रवीण दरेकर यांच्या नावाचा उल्लेख असून, जरांगे यांच्याविरोधात पक्षातून कोणीही बोलायला तयार नसल्याची खंतही त्यात व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, सदर बैठकीमध्ये विरोधकांबद्दलही काही उल्लेख करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकारामुळे निवडणुकीच्या काळात मराठा आंदोलनाला आणि नेत्यांना बदनाम करण्यासाठी यंत्रणा कशा पद्धतीने कार्यरत होती, याचे मोठे पुरावे हाती लागल्याचे जरांगे समर्थकांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा : मनोज जरांगेंना नडून एकनाथ शिंदे मराठा मतांची जोखीम घेणार?

राजकीय वर्तुळात 

या ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच वादळ उठले असून आगामी काळात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप झाल्यामुळे राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या या संघर्षात आता आर्थिक देवाणघेवाणीचे आणि षडयंत्र रचल्याचे आरोप समोर आल्याने या वादाला नवीन आणि गंभीर वळण मिळाले आहे.