गोकुळमध्ये सतेज पाटील यांचा विजय, हर्षदा जाधव देशमुख काय म्हणाल्या?

मुंबई तक

• 09:36 AM • 21 Oct 2026

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मविआच्या उमेदवार हर्षदा जाधव यांनी महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव यांच्यावर टीका करत विजयाचा दावा केला. त्या नेमकं काय म्हणाल्या, जाणून घेऊया.

Pune Graduate Constituency

Pune Graduate Constituency

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील यांचा दणदणीत विजय

point

हर्षदा जाधव देशमुख काय म्हणाल्या?

Pune Graduate Constituency : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील आघाडीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास अधिक दुणावला आहे. पंढरपूर येथे आयोजित पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या प्रचार मेळाव्यात बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी गोकुळच्या निकालाचा संदर्भ देत महायुती आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आगामी पुणे पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव गोकुळच्या निकालाची पुनरावृत्ती करत नक्कीच विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हे वाचलं का?

पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यावर भर

प्रचार मेळाव्यात पत्रकारांशी बोलताना पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी आपल्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. गेल्या दोन वर्षांपासून या मतदारसंघातील पदवीधर, शिक्षक आणि तरुण विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांच्या दाव्यांवर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, भूतकाळात झालेल्या चुकांवर बोट ठेवण्यापेक्षा भविष्यात पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यावर आपला भर असेल. एमपीएससीच्या परीक्षार्थ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी परीक्षेच्या नियमित वेळापत्रकासह पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.

हे ही वाचा : शशिकांत चुयेकर यांनी सांगितली सतेज पाटील यांची विजयाची रणनीती

विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित

प्रतिस्पर्धी महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव यांच्या शैक्षणिक अनुभवाच्या दाव्याचा समाचार घेताना हर्षदा जाधव यांनी शिक्षण क्षेत्रासोबतच रोजगारनिर्मिती आणि सामान्य माणसांचे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. ग्रामीण महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील, पतंगराव कदम, राजारामबापू आणि विजयदादा यांसारख्या महान नेत्यांनी उभारलेल्या अनुदानित शिक्षण संस्थांच्या जाळ्याला सध्याच्या धोरणांमुळे मोठा फटका बसत आहे. हजारो शिक्षकभरती पेंडिंग असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

हे ही वाचा : Maharashtra Weather : हवामानाचा लपंडाव, कधी पाऊस, तर कधी कोरडं हवामान; IMD चा अलर्ट

विजयाचा 'दसरा' साजरा करू

आपल्या पंढरपूरशी असलेल्या भावनिक आणि वैयक्तिक नात्याचा उल्लेख करताना हर्षदा जाधव यांनी सांगितले की, त्यांचा जन्म पंढरपूरच्या पावन भूमीत झाला आहे. पंढरपूर हा क्रांती आणि जिद्दीचा जिल्हा असल्याने तिथूनच त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आणि ऊर्जा मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत, आगामी निवडणुकीत विजयाचा 'दसरा' नक्की साजरा करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोकुळ दूध संघाच्या निकालाने निर्माण झालेली बदलाची हवा पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही कायम राहील, असा ठाम दावा त्यांनी यावेळी केला.