सोन्याचे भाव पुन्हा वाढले! भारत-पाक तणावामुळे आठवड्याभरात मोठी वाढ, 24 कॅरेटचे रेट काय? जाणून घ्या...

स्थानिक बाजारातील सोन्याच्या किमतींबाबत (Gold Price) इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) वेबसाइटनुसार, 2 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 93,954 रुपये प्रति तोळा होता. तर नंतर त्या कमालीची वाढ झाली होती.

Mumbai Tak

मुंबई तक

11 May 2025 (अपडेटेड: 11 May 2025, 11:39 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारत-पाक संघर्षादरम्यान सोन्याचे भाव वाढले

point

सोन्याचे भाव किती रुपयांनी वाढले? जाणून घ्या...

Gold Rate in India : भारत आणि पाकिस्तानदरम्यान सीमेवर वाढलेल्या तणावाच्या (Indo-PAK War Tension) पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत (Gold Rate) मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. गेल्या आठवड्याभरात सोन्याचा भाव तब्बल 4,000 रुपये प्रति तोळ्याने (10 ग्राम) वाढला आहे.

हे वाचलं का?

यापूर्वी सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत होती, परंतु पहलगाम येथील दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) मुळे सोन्याच्या किमतींवर थेट परिणाम झाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) तसेच स्थानिक बाजारातही सोन्याच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे.

MCX वर सोन्याच्या किमतीत बदल

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 2 मे रोजी 5 जून 2025 च्या एक्सपायरीसह 999 शुद्ध सोन्याचा भाव 92,637 रुपये प्रति तोळा होता. मात्र, 9 मे रोजी हा भाव वाढून 96,535 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला. यानुसार, आठवड्याभरात MCX वर सोनं 3,898 रुपये प्रति तोळ्याने महागलं आहे.

हे ही वाचा >> पैसा-पाणी: भारत-पाक तणाव, शेअर बाजाराचं काय होईल?

स्थानिक बाजारात सोन्याचा भाव

स्थानिक बाजारातील सोन्याच्या किमतींबाबत (Gold Price) इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) वेबसाइटनुसार, 2 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 93,954 रुपये प्रति तोळा होता. 9 मे रोजी हा भाव वाढून 96,420 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला. यानुसार, स्थानिक बाजारातही सोनं आठवड्याभरात 2,466 रुपये प्रति तोळ्याने महागलं आहे.

IBJA ची काय भूमिका?

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (Indian Bullion Jewelers Association) दररोज सोनं आणि चांदीच्या किमतींची माहिती प्रसिद्ध करतं. या किमती कर (टॅक्स) आणि मेकिंग चार्जशिवाय असतात. IBJA कडून जाहीर केलेले भाव देशभरासाठी एकसमान असतात. सोनं किंवा चांदी खरेदी करताना किंवा तयार करताना ग्राहकांना मेकिंग चार्ज आणि त्यावरील जीएसटी स्वतंत्रपणे द्यावा लागतो. त्यामुळे ती किंमत आणखी वाढते. 

हे ही वाचा >> "पाकिस्तानच्या मातीत दहशतवादाला...", ट्रम्प यांच्या हस्तक्षेपावरून संतप्त ओवैसींचे 4 सवाल

सीमेवरील तणाव आणि जागतिक घडामोडींचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत असल्यानं येत्या काही दिवसांतही सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळू शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.


 

    follow whatsapp