Personal Finance Tips for SIP Calculation: सध्याच्या काळात प्रत्येकजण आपल्या छोट्या बचतीतून भविष्यासाठी एक मोठी रक्कम जमविण्याचा प्रयत्न करतो. परंतु समस्या अशी आहे की, योग्य गुंतवणूक पर्याय त्यांना समजत नाही. अशा परिस्थितीत, SIP किंवा म्युच्युअल फंडचा सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन तुमच्यासाठी एक उत्तम आणि पैसे कमावणारा पर्याय ठरू शकतो. जर तुम्हाला 30 वर्षांत एक चांगला फंड तयार करायचा असेल, तर SIP मध्ये ₹4000, ₹5000, ₹6000, ₹7000, ₹8000, ₹9000 किंवा ₹10000 गुंतवून किती फंड तयार करता येईल ते जाणून घ्या.
ADVERTISEMENT
जर तुम्ही नियमितपणे SIP मध्ये योग्य रक्कम गुंतवली तर तुम्ही कमी वेळातही एक चांगला फंड तयार करू शकता. समजा तुम्ही ₹4000, ₹5000, ₹6000, ₹7000, ₹8000, ₹9000 किंवा ₹10000 ची SIP सुरू केली आणि ते 30 वर्षांपर्यंत चालू ठेवलं, तर कंपाउंडिंगद्वारे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी एक मजबूत आर्थिक पाया रचू शकता.
SIP म्हणजे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम गुंतवता आणि जर तुम्ही बराच काळ गुंतवणूक करत राहिलात तर कंपाउंडिंगची जादू तुम्हाला दिसून येईल. म्हणजे तुम्हाला समजेल की जर तुम्ही 30 वर्षे SIP केली तर अंदाजे 12% वार्षिक परताव्याच्या आधारे किती फंड तयार करता येईल.
SIP मध्ये 4000 रुपयांची गुंतवणूक केली तरी किती कोटी मिळतील?
जर तुम्ही SIP मध्ये ₹4000 आणि ₹5000 गुंतवले तर तुम्ही 30 वर्षांत कोट्यधीश होऊ शकता, यामध्ये तुम्हाला अंदाजे 12 टक्के पर्यंत वार्षिक परतावा मिळेल. ₹4000 च्या SIP मध्ये गुंतवणूक रक्कम
₹14,40000 (14.4 लाख) असेल. यामध्ये तुमचा नफा तब्बल 1.1 कोटी असेल आणि एकूण मॅच्युरिटी फंड ₹ 1.2 कोटी असेल.
SIP मध्ये 5000 रुपयांची गुंतवणूक केली तरी किती कोटी मिळतील?
₹5000 ची गुंतवणूक 30 वर्षांसाठी केली तर मूळ गुंतवणूक 18 लाख असेल, ज्यामध्ये तुम्हाला नफा 1.4 कोटी मिळेल आणि मॅच्युरिटीनंतर एकूण फंड ₹ 1.5 कोटी एवढा असेल.
SIP मध्ये 6000 रुपयांची गुंतवणूक केली तरी किती कोटी मिळतील?
जर तुम्ही 30 वर्षांसाठी दरमहा ₹ 6000 SIP मध्ये गुंतवले तर तुम्ही 12 टक्के परताव्यानुसार कोट्यधीश व्हाल. एकूण ₹6000 ची गुंतवणूक अंदाजे 21.6 लाख असेल. यामध्ये तुम्हाला नफा सुमारे 1.6 कोटी होईल आणि मॅच्युरिटीनंतर तुम्हाला 1.8 कोटी फंड मिळेल.
SIP मध्ये 7000 रुपयांची गुंतवणूक केली तरी किती कोटी मिळतील?
₹7000 च्या गुंतवणुकीवर तुमचा फंड अधिक मजबूत होईल. ₹7000 मधील गुंतवणूक रक्कम ₹25.6 लाख असेल. ज्यामध्ये तुम्हाला निव्वळ नफा ₹ 1.8 कोटी होईल आणि मॅच्युरिटी फंड ₹1.9 कोटी होईल.
SIP मध्ये 8000 रुपयांची गुंतवणूक केली तरी किती कोटी मिळतील?
जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा ₹8000, ₹9000 आणि ₹10000 चे SIP केले आणि ते 30 वर्षे चालू ठेवले तर त्याच्याकडे कोट्यवधी रूपयांचा फंड असेल. ₹8000 ची गुंतवणूक रक्कम ₹28.8 लाख असेल, तर त्यावर त्याला नफा सुमारे ₹2.2 कोटी मिळेल आणि मॅच्युरिटी फंड ₹2.5 कोटी असेल.
SIP मध्ये 9000 रुपयांची गुंतवणूक केली तरी किती कोटी मिळतील?
₹9000 ची गुंतवणूक रक्कम ₹32.4 लाख असेल, त्यावर नफा सुमारे ₹2.4 कोटी असेल. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर हा फंड तब्बल ₹2.8 कोटीपर्यंत असेल.
SIP मध्ये 10000 रुपयांची गुंतवणूक केली तरी किती कोटी मिळतील?
₹10000 च्या SIP मध्ये गुंतवणूक रक्कम ₹36 लाख) आहे. त्यावर नफा सुमारे ₹2.7 कोटी आहे आणि मॅच्युरिटी फंड तब्बल ₹ 3.1 कोटीपर्यंत झालेला असेल.
जर तुम्ही SIP सुरू करत असाल, तर हे लक्षात ठेवा की SIP हा दीर्घकाळात संपत्ती निर्मितीचा एक अतिशय प्रभावी आणि विश्वासार्ह मार्ग आहे. यामुळे तुमच्या लहान बचतीचे रूपांतर मोठ्या रकमेत तर होतेच, शिवाय तुमच्या भविष्यातील स्वप्नांना पूर्ण करण्याचा मार्गही सोपा होतो.
(टीप: हा लेख केवळ माहितीसाठी आहे आणि कोणत्याही प्रकारे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या.)
Personal Finance सीरीजमधील या बातम्याही वाचा:
1. Personal Finance: शेअर बाजाराची भीती वाटते? तर Gold ETF मध्ये गुंतवा पैसे, 10 हजार रुपयात व्हाल करोडपती!
2. पैसा-पाणी: भारतीयांना सोन्याचं व्यसन, सरकारने मानली हार.. 3 मोठ्या योजना अपयशी!
3. Personal Finance: ATM मधून पैसे काढणे होणार महाग, 1 मे पासून मोजावे लागणार 'एवढे' पैसे
4. Personal Finance: घर खरेदी करावं की भाड्याने घ्यावं.. काय चूक, काय बरोबर? 'हा' फॉर्म्युला ठेवा लक्षात?
5. Personal Finance तुम्हाला मिळतील 4 कोटी, फक्त SNP हा प्लॅन ठेवा लक्षात.. हाती येईल प्रचंड पैसा!
6. Personal Finance: FD पेक्षा जास्त मिळतील पैसे, 'ही' जबरदस्त योजना तुम्हाला माहिती आहे का?
7. Personal Finance: जर तुम्हाला घरबसल्या PF चे पैसे हवे तर फक्त 'एवढंच' करा.., थेट तुमच्या खात्यात पैसे
8. गुड न्यूज: तुमचा घराचा हप्ता होणार कमी, EMI भरताना 'एवढे' पैसे वाचणार!
9. Personal Finance: शेअर मार्केटचा बाजारच उठला, आता करावं तरी काय?
10. Personal Finance: ATM वापरलं की, तुमचे पैसे कापले जाणार, 1 मे पासून येणार नियम पाहून ठेवा बरं!
11. Personal Finance: 50,000 रुपये पगार असलेली लोकंही बनू शकतात करोडपती, फक्त 300...
12. Personal Finance: EPFO कडून मोठा दिलासा, PF मधून काढता येणार 5 लाख... तेही थेट UPI आणि ATM वापरून!
13. Personal Finance: 500 रुपयांच्या मासिक SIP ने किती दिवसांत होऊ शकता कोट्यधीश? संपूर्ण गणित घ्या समजून
14. SIP सारखी जबरदस्त कमाई आणि FD सारखे दर महिन्याला पैसे, SWP प्लॅन नेमका काय?
15. Personal Finance: गुंतवणुकीवर किती पैसे मिळणार हे सत्य कोणीही सांगत नाही, 70 चा फॉर्म्युला तुम्हाला टाकेल हादरवून!
16. Personal Finance: LIC ची रक्कम किती असावी? 'हा' फॉर्म्युला खूप फायदेशीर
ADVERTISEMENT
