Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात मुख्यत्वे स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. तथापि, राज्याच्या अंतर्गत भागात थंडीची लाट कायम राहू शकते, ज्यामुळे किमान तापमान 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता वर्तवली आहे. सकाळी धुके आणि थंड वारे यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊयात 14 डिसेंबर रोजी राज्यातील हवामानाचा एकूण अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : टिटवाळा हादरलं! रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला पिकअपने चिरडलं, महिलेचा दुर्दैवी अंत
कोकण विभाग :
कोकण विभागातील हवामान हे मुख्यत्वे सकाळी धुक्याची चादर पसरेल. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरडं वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत हलकी थंडी जाणवेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहेत.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्र विभागात हवामान हे स्वच्छ, तसेच सकाळी धुक्यांची चादर पसरणार असल्याची शक्यता आहे. तसेच पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट पसरेल अशी शक्यता आहे. पुण्यात किमान तापमान 9 तर कमाल 29 अंश सेल्सिअस राहील. या विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहिला असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्रातून लहान मुलं, मुली पळवल्या जातायत, राज ठाकरेंनी एनसीआरबी अहवालाचा दाखला देत फडणवीसांना सुनावलं..
मराठवाडा विभाग आणि विदर्भ :
छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात कडाक्याची थंडी आहे. ही थंडीची लाट कायम राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 तर नांदेडमध्ये 13 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले जाईल. विदर्भात मात्र गारठ्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. किमान तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











