अमेरिकेतील App स्टोअरमध्ये एक मोठा उलटफेर झाला आहे. गेल्या आठवड्यात Cloud सर्वात जास्त डाउनलोड होणारे App बनलं आहे, तर ChatGPT खाली आलं आहे. हा बदल कसा घडला? त्यामागील कहाणी आपण पैसा-पाणी या विशेष सदरातून समजून घेऊया.
ADVERTISEMENT
Anthropic ने सरकारला 'नाही' म्हटले
Anthropic कंपनीने Claude AI तयार केलं आहे, त्यांचा असा दावा आहे की, अमेरिकन सरकार AI चा "दुरुपयोग" करू इच्छित होते. त्यांच्या मते, सरकार Claude चा वापर दोन उद्देशांसाठी करू इच्छित होते. पहिले, स्वतःच्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि दुसरे, स्वचलित शस्त्रे विकसित करण्यासाठी. Anthropic ने यासाठी स्पष्टपणे नकार दिला. करार मोडला गेला. सरकारने OpenAI सोबत नवीन करार केला.
करार मोडल्याची बातमी बाहेर येताच अमेरिकन लोक प्रचंड चिडले. ज्यानंतर OpenAI चे ChatGPT हे अनइंस्टॉल होऊ लागलं, तर त्याऐवजी अमेरिकन लोकं हे मोठ्या प्रमाणात Cloude इंस्टॉल करू लागले.
हा संघर्ष जुना
Anthropic आणि OpenAI मधील स्पर्धा नवीन नाही. Claude चे संस्थापक डारियो अमोदेई हे यापूर्वी OpenAI मध्ये सॅम ऑल्टमनसोबत काम करत होते. पैसे कमविण्याच्या घाईत कंपनी AI सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे या चिंतेमुळे त्यांनी 2021 मध्ये OpenAI कंपनी सोडली होती. या मतभेदावरच Anthropic ची स्थापना झाली. ही कंपनी एका लिखित AI संविधानानुसार काम करते, सुरक्षितता ही त्याची प्राथमिकता आहे.
तर, Claude म्हणजे काय?
असं समजा की, जर ChatGPT तुमचा वैयक्तिक सहाय्यक असेल, जो ईमेल लिहित असेल, प्रश्नांची उत्तरे देत असेल आणि लहान कामे हाताळत असेल, तर Claude एका संशोधन विश्लेषकासारखा आहे. तो जटिल विश्लेषण, कायदेशीर कागदपत्रे आणि सखोल संशोधन हाताळू शकतो. ChatGPT पेक्षा Claude चे यूजर्स बरेच कमी आहेत.
ChatGPT चे 70 ते 80 कोटी यूजर्स आहेत. तर Claude चे अंदाजे 2 ते 3 कोटी यूजर्स आहेत, परंतु त्यांच्यामधील महसूलातील तफावत तितकी लक्षणीय नाही. ChatGPT चा अंदाजे महसूल 25 अब्ज डॉलर्स आहे, तर Claude चा 14 अब्ज डॉलर्स आहे. ChatGPT हे सरासरी ग्राहकांवर लक्ष केंद्रित करते, तर Claude कंपन्यांवर लक्ष केंद्रित करते आणि कंपन्या अधिक पैसे देतात.
शेअर बाजारही हादरला
Claude केवळ ChatGPT लाच नव्हे तर संपूर्ण क्षेत्राला आव्हान देत आहे. Claude चे Co-Work फिचर हे त्या सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी धोका बनलं आहे जे पूर्वी कोडिंगचं काम हे माणसांकडून करून घेत होतं. कायदेशीर कामातही ते वेगाने स्थान मिळवत आहे. या भीतीमुळे संबंधित क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली आहे. AI च्या जगात क्लाउडला अॅपलसारखे पाहिले जात आहे. कमी यूजर्स, परंतु जास्त कमाई. Chatgpt अजूनही जगातील सर्वाधिक वापरला जाणारा AI आहे. परंतु पहिल्यांदाच, कोणीतरी खरोखरच त्याला आव्हान देत आहे.
ADVERTISEMENT











