Personal Finance: जमीन खरेदीत कोणते कागदपत्र असू शकतात बनावट?

रोहित गोळे

• 06:00 AM • 31 Jul 2026

NA Land: जमीन खरेदी करण्यापूर्वी 7/12 उतारा, फेरफार नोंद, Sale Deed, Title Search, Encumbrance, NA Order आणि इतर कागदपत्रांची तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

personal finance documents can be forged when buying land a 12 point checklist to avoid fraud

प्रातिनिधिक फोटो

Google CTA

Personal Finance Land Documents: जमीन खरेदी हा आयुष्यातील मोठ्या आर्थिक व्यवहारांपैकी एक आहे. अनेक जण वर्षानुवर्षे बचत करून किंवा कर्ज घेऊन प्लॉट किंवा जमीन खरेदी करतात. त्यामुळे व्यवहार करण्यापूर्वी केवळ जमीन पाहणे किंवा विक्रेत्याने दाखवलेली कागदपत्रे पाहणे पुरेसे नाही. संबंधित कागदपत्रे अधिकृत नोंदींशी पडताळणे तितकेच महत्त्वाचे आहे.

हे वाचलं का?

काही प्रकरणांमध्ये बनावट किंवा फेरफार केलेले दस्तऐवज, चुकीची मालकी माहिती, बनावट Power of Attorney किंवा आधीच विकलेली/गहाण ठेवलेली जमीन पुन्हा विकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे जमीन खरेदीपूर्वी खालील checklist लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

1. 7/12 उतारा तपासा

7/12 उतारा हा महत्त्वाचा महसूल दस्तऐवज आहे; मात्र तो एकटाच मालकीचा अंतिम पुरावा समजू नये. यामध्ये जमीन कोणाच्या नावावर आहे, जमिनीचा प्रकार, क्षेत्रफळ, पीक किंवा इतर नोंदी याबाबत माहिती मिळू शकते.

काय तपासाल?

  • मालकाचे नाव
  • गट नंबर/सर्व्हे नंबर
  • क्षेत्रफळ
  • जमिनीचा प्रकार
  • इतर हक्क/बोजा यासंबंधी नोंदी
  • नोंदीतील बदल

विक्रेत्याने दिलेल्या कागदपत्रातील माहिती आणि अधिकृत महसूल नोंदीतील माहिती जुळते का, हे तपासा.

2. फेरफार नोंद (Mutation Entry) तपासा

जमिनीची मालकी किंवा हक्क बदलल्यानंतर संबंधित फेरफार नोंद महत्त्वाची ठरते.

उदाहरणार्थ, जमीन वारसाहक्काने मिळाली असेल, विक्री झाली असेल किंवा इतर कारणाने मालकीत बदल झाला असेल तर त्यासंबंधी फेरफार नोंदी तपासणे आवश्यक आहे.

फक्त नवीन मालकाचे नाव दिसते म्हणून व्यवहार पूर्ण करू नका. त्या नावामागील मालकीचा इतिहास तपासा.

3. जुने Sale Deed / खरेदीखत तपासा

विक्रेता जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचे सांगत असेल, तर त्याने ती जमीन पूर्वी कशी मिळवली हे तपासणे महत्त्वाचे आहे.

  • पूर्वीचे Sale Deed
  • Gift Deed
  • Partition Deed
  • Release Deed
  • वारसाहक्काशी संबंधित कागदपत्रे

मालकीचा इतिहास म्हणजे Title Chain व्यवस्थित आहे का, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

4. Title Search / Title Report करून घ्या

हा जमीन खरेदीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. Property Lawyer कडून संबंधित जमिनीचा Title Search करून घ्या. यामध्ये मागील अनेक वर्षांतील मालकी आणि व्यवहार तपासले जाऊ शकतात.

  • जमीन वादग्रस्त आहे का?
  • पूर्वी कोणाच्या नावावर होती?
  • त्यावर कोणाचा हक्क आहे?
  • आधी विक्री किंवा हस्तांतरण झाले आहे का?

यासारख्या बाबी समोर येऊ शकतात.

5. Encumbrance / बोजा तपासा

जमिनीवर बँकेचे कर्ज, गहाण, न्यायालयीन हक्क किंवा इतर आर्थिक बोजा आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.

विक्रेता “जमीन पूर्णपणे क्लिअर आहे” असे सांगत असला तरी अधिकृत नोंदी तपासा.

कर्ज किंवा गहाण असलेली जमीन योग्य प्रक्रिया न करता खरेदी केल्यास पुढे मोठी अडचण निर्माण होऊ शकते.

6. Sale Deed आणि Registration तपासा

विक्रेत्याने दाखवलेले खरेदीखत खरे आहे का, याची नोंदणी कार्यालयातील रेकॉर्डशी पडताळणी करा.

  • Document Number
  • Registration Date
  • Seller/Buyer Details
  • Property Details
  • Survey/Gat Number
  • Area

यामध्ये कोणतीही विसंगती आहे का ते तपासा. फक्त Xerox किंवा स्कॅन कॉपीवर विश्वास ठेवू नका.

7. Power of Attorney असल्यास विशेष काळजी

काही वेळा जमीन मालकाच्या वतीने दुसरी व्यक्ती व्यवहार करत असते. अशावेळी Power of Attorney (POA) तपासणे अत्यंत आवश्यक आहे.

  • POA नोंदणीकृत आहे का?
  • ती वैध आहे का?
  • त्यामध्ये जमीन विकण्याचा अधिकार दिला आहे का?
  • POA देणारी व्यक्ती खरोखर मालक आहे का?
  • POA रद्द करण्यात आलेली नाही ना?

POA च्या आधारे होणाऱ्या व्यवहारात Property Lawyer चा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते.

8. वारसाहक्काची जमीन असल्यास सर्व वारस तपासा

जमीन वारसाहक्काने मिळालेली असल्यास केवळ एका व्यक्तीचे नाव पाहून व्यवहार करू नका. मूळ मालकाचा मृत्यू झाला असल्यास पुढील गोष्टी तपासणं गरजेचं आहे.

  • वारसांची माहिती
  • वारस नोंद
  • मृत्यू प्रमाणपत्र
  • वारसांमधील हक्क
  • वाटणी/Partition संबंधित कागदपत्रे

एखादा वारस व्यवहाराला संमती देत नसेल तर पुढे कायदेशीर वाद निर्माण होऊ शकतो.

9. जमीन NA आहे का, हे तपासा

तुम्ही प्लॉटवर घर किंवा इतर बांधकाम करण्यासाठी जमीन घेत असाल तर तिचा वापर काय आहे, हे समजून घ्या.

Agricultural Land आणि Non-Agricultural (NA) Land यामध्ये महत्त्वाचे फरक आहेत.

विक्रेता “हा Residential Plot आहे” असे सांगत असल्यास संबंधित मंजुरी आणि जमीन वापराची अधिकृत कागदपत्रे तपासा.

10. Approved Layout आणि परवानग्या तपासा

Developer किंवा जमीन विकणारी व्यक्ती प्लॉट विकत असेल तर संबंधित Layout मंजूर आहे का, हे तपासा.

  • Layout Approval
  • संबंधित स्थानिक प्राधिकरणाची मंजुरी
  • रस्त्याची तरतूद
  • Open Space
  • सार्वजनिक सुविधांसाठी राखीव जागा

याबाबतची माहिती तपासा. फक्त जाहिरातीतील “Government Approved” किंवा “NA Plot” या शब्दांवर विश्वास ठेवू नका.