महिन्याचा पगार आला की घरभाडे, EMI, किराणा, वीज बिल, मोबाईल रिचार्ज, प्रवास आणि इतर खर्चांमध्ये मोठा हिस्सा जातो. त्यामुळे महिन्याच्या शेवटी बचतीसाठी फारशी रक्कम उरत नाही. मात्र, मोठी कमाई होण्याची वाट पाहण्याऐवजी रोजच्या खर्चात छोटे बदल केले, तर महिन्याला 5000 रुपयांपर्यंतची बचत करणे शक्य होऊ शकते. यासाठी खर्च बंद करण्यापेक्षा अनावश्यक खर्च ओळखणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
ADVERTISEMENT
1. बाहेरच्या चहा-कॉफीचा खर्च कमी करा
दररोज ऑफिसमध्ये चहा, कॉफी किंवा नाश्त्यासाठी 50-100 रुपये खर्च होत असेल, तर महिन्याला सहज 1,500 ते 3,000 रुपये खर्च होऊ शकतो. आठवड्यात काही दिवस घरून चहा-कॉफी किंवा नाश्ता नेल्यास हा खर्च मोठ्या प्रमाणात कमी करता येईल.
2. OTT आणि Subscription तपासा
Netflix, Prime Video, YouTube Premium, Music Apps, Cloud Storage अशा अनेक Subscriptionचे पैसे दर महिन्याला आपोआप कट होतात. महिन्यातून एकदा सर्व Subscriptionची यादी करा. वापरात नसलेल्या सेवा बंद केल्यास 300 ते 1,000 रुपये किंवा त्याहून अधिक बचत होऊ शकते.
3. Online Shoppingसाठी ‘24 तासांचा नियम’
ऑनलाइन Shopping करताना दिसलेली प्रत्येक वस्तू लगेच खरेदी करू नका. आवश्यक नसलेल्या वस्तूसाठी किमान 24 तास थांबा. दुसऱ्या दिवशीही ती वस्तू आवश्यक वाटत असेल तरच खरेदी करा. Impulse Shopping कमी झाल्यास महिन्याच्या बजेटवर मोठा फरक पडू शकतो.
4. Food Deliveryला मर्यादा घाला
आठवड्यातून अनेकदा Food Delivery केल्यास जेवणाच्या किंमतीपेक्षा Delivery Fee, Platform Fee आणि इतर Chargesमुळे खर्च वाढतो. महिन्यातील Food Deliveryची संख्या कमी करून घरचे जेवण किंवा Meal Planning केल्यास ₹1,000-₹2,000पर्यंत बचत होऊ शकते.
5. प्रवासाच्या खर्चाचा पुन्हा विचार करा
दररोज स्वतःची कार किंवा कॅब वापरण्याऐवजी शक्य असेल तेव्हा Public Transport, Car Pool किंवा दोन-तीन दिवसांचा Work From Home पर्याय वापरा. विशेषतः ऑफिसचा रोजचा प्रवास मोठा असेल तर महिन्याच्या खर्चात चांगली बचत होऊ शकते.
6. किराणा खरेदीची Planning करा
किराणा दुकानात किंवा Online Grocery Appवर गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी होतात. महिन्याची Shopping List तयार करा आणि त्यानुसार खरेदी करा. Offersच्या नावाखाली अनावश्यक वस्तू घेण्यापेक्षा प्रत्यक्षात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरच पैसे खर्च करा.
7. Credit Cardचा योग्य वापर करा
Credit Cardमुळे खरेदी सोपी होते, मात्र बिल पूर्ण न भरल्यास व्याजाचा मोठा भार पडू शकतो. शक्यतो दर महिन्याचे संपूर्ण Credit Card Bill वेळेवर भरा. Minimum Due भरून उर्वरित रक्कम पुढे ढकलणे टाळा. यामुळे अनावश्यक व्याज आणि Late Payment Charges पासून बचाव होऊ शकतो.
8. Electricity आणि घरातील छोट्या खर्चांवर लक्ष द्या
वापरात नसताना AC, पंखे, दिवे आणि इतर उपकरणे बंद ठेवणे, ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर करणे यामुळे वीजबिलावर नियंत्रण ठेवता येते. छोट्या बचतींची बेरीज महिन्याला चांगली रक्कम वाचवू शकते.
9. पगाराच्या दिवशीच 5000 रुपये बाजूला काढा
बचत करण्याचा सर्वात सोपा नियम म्हणजे “पहिले Save, नंतर Spend.” पगार जमा झाल्यानंतर लगेच 5000 रुपये वेगळ्या Savings Account मध्ये किंवा आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार योग्य गुंतवणुकीत बाजूला काढा. उरलेल्या रकमेत महिन्याचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करा.
10. प्रत्येक खर्चाची नोंद ठेवा
50, 100 किंवा 200 रुपये असे छोटे खर्च दुर्लक्षित केले जातात. मात्र, महिन्याच्या शेवटी याच खर्चांची बेरीज मोठी होते. त्यामुळे 30 दिवस प्रत्येक खर्चाची नोंद करा. त्यानंतर कोणत्या प्रकारच्या खर्चावर सर्वाधिक पैसे जात आहेत, हे स्पष्ट होईल आणि तिथे कपात करता येईल.
5000 रुपये बचतीचे Practical गणित
समजा तुम्ही महिन्याला खालीलप्रमाणे खर्च कमी केल्यास..
ADVERTISEMENT












